News

राज्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. आता मोठ्या प्रमाणावर सिंचनाची व्यवस्था असल्यामुळे शेतकर्‍यांनी रब्बी हंगामासाठी गहु, हरभरा, मका, उन्हाळी सोयाबीन आदी पिकांची पेरणी केली आहे.

Updated on 31 December, 2022 11:09 AM IST

राज्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. आता मोठ्या प्रमाणावर सिंचनाची व्यवस्था असल्यामुळे शेतकर्‍यांनी रब्बी हंगामासाठी गहु, हरभरा, मका, उन्हाळी सोयाबीन आदी पिकांची पेरणी केली आहे.

तसेच भाजीपाल्याचाही लागवड केली आहे. देऊळगांवराजामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर लागवड झाली आहे. असे असताना खताच्या किंमतीमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. यामुळे येणारे वर्ष देखील शेतकऱ्यांना सुगीचे जाणार की नाही, असा प्रश्न पडला आहे.

यावर्षी रासायनिक खतांचे भाव गगनाला भिडले आहेत. रासायनिक खतांचे भाव वाढल्याने खतांचा वापर निम्म्याने घटला आहे. पेरणी झाल्यानंतर पिकांची वाढ होण्यासाठी युरिया खतांची शेतकर्‍यांना आवश्यकता असते.

महावितरणची नवीन शाळा! ट्रान्सफॉर्मर बदलायचाय मग वीज बिल भरा..

असे असताना मात्र तालुक्यातील संगनमताने युरिया खताचा खर्च शेतकर्‍यांना पुरवठा होत नाही. यामुळे गरज असताना खते देखील मिळत नाहीत. यामुळे केवळ खतांचा पुरेसा साठा असल्याचे सरकार सांगत असले तरी प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे.

'आता प्राण्यांच्या हल्ल्यात शेतीचे नुकसान झाल्यास भरपाईची रक्कम दुप्पट करणार'

मागणी करूनही युरिया शेतकर्‍यांना मिळत नाही. यामुळे शेतकरी आता अडचणीत आला आहे. याकडे सर्वांचे लक्ष देणे गरजेचे आहे. नाहीतर यावर्षी देखील शेतकरी कर्जबाजारी होणार आहे.

महत्वाच्या बातम्या;
आता राजू शेट्टी करणार पालकमंत्र्यांच्या घरासमोर बिऱ्हाड आंदोलन..
हिंगोलीतील शेतकऱ्याची पोलिसांत तक्रार, उपमुख्यमंत्री फडणवीस खोटे बोलले असल्याची तक्रार
29 गुंठ्यांत 3 लाखांचा नफा! काकडीची शेती ठरली फायद्याची

English Summary: Farmers face inflation new year! Fertilizer prices increased by 40 percent
Published on: 31 December 2022, 11:09 IST