गेल्या काही दिवसांपासून राज्यात शेतकऱ्यांची वी तोडली जात आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. यामुळे राज्यातील शेतकरी रस्त्यावर उतरला होता. अनेक ठिकाणी आंदोलने केली जात होती. तसेच अधिवेशनात यावरून मोठा वाद झाला. असे असताना आता ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी एक मोठी घोषणा केली आहे. सध्या वीज तोडणी ही तीन महिन्यांसाठी थांबण्यात आली आहे. त्याचबरोबर तोडलेली वीज पुर्ववत करणार असल्याचीही घोषणा उर्जामंत्र्यांनी सभागृहात केली आहे.
यामुळे शेतकरी आंदोलनाला मोठे यश आले आहे. अधिवेशनात वीजतोडणीच्या मुद्दा गाजत होता. अनेक शेतकऱ्यांनी यामुळे आत्महत्या केल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. विविध सत्ताधारी पक्षातील आमदारांनी, विरोधी पक्ष, अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनीही आवाज उठवला होता आणि ही वीज तोडणी त्वरीत थांबवावी अशी मागणी केली होती.
यामुळे आता शेतकरी आपली हातातोंडाला आलेली पीक जगवू शकणार आहेत. शेतकऱ्यांच्या हातात पीक येइपर्यंत वीज तोडणी थांबवली आहे. कृषी ग्राहकांना दिवसभरात वीज मिळावी यासाठी समिती नेमली आहे ते एक महिन्यात अहवाल देतील अशीही माहिती नितीन राऊत यांनी सभागृहात दिली आहे. शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी कोल्हापूरमध्ये दहा दिवस आंदोलन केले होते. आता याबाबत देखील निर्णय होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान मागच्या सरकारने वीज बिल दिली नाही. बँकेचे कर्ज असल्यामुळे महावितरणची (Mahavitaran) परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे नाईलाजास्कव वीज पुरवठा खंडित करावा लागला होता, असेही सांगण्यात आले आहे. असे असले तरी या काळात अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे अनेक शेतकरी अडचणीत आले आहेत. यामुळे अनेकांचे उत्पन्न घटले आहे.
Published on: 15 March 2022, 02:46 IST