सध्या शेती करणे जिकरीचे झाले आहे. शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. सध्या शेतकऱ्यांची वीज तोडली जात आहे. यामुळे त्यांना आर्थिक फटका बसत आहे. शेतात सिंचनाची सोय असूनही Power generation विजेअभावी त्याच्या उपयोग होत नव्हता. आता सततचे भारनियमाला कंटाळून शेतकऱ्याने ट्रॅक्टरच्या सहायाने जनरेटर चालवून वीज निर्मिती केली आहे. यामुळे सध्या याची चर्चा सुरु आहे.
यामुळे शेतीला सिंचीत करण्याचा यशस्वी प्रयोग त्यांनी करून दाखवला आहे. याबाबत माहिती अशी की रविंद्र बुरडे रा. मोरगाव ता. मोहाडी असे या प्रयोगशील शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांचा हा जुगाड इतर शेतकऱ्यांसाठी नक्कीच फायद्याचा ठरत आहे. सध्या भारनियम यामुळे सिंचनाअभावी शेती धोक्यात आली आहे. तसेच अनेकदा वीज देशील तोडली जात आहे.
यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान होऊन आत्महत्या करण्यासारखे टोक्याचे पाऊल उचलण्याची वेळ येते. शेती सिंचनाकरिता वीज उपलब्ध व्हावी या दृष्टीने शेतकरी रविंद्र बुरडे यांनी नवीन प्रयोग करून पाहिला. ट्रॅक्टरच्या सहाय्याने जनरेटर चालवून 5 अश्वशक्तीच्या तीन मोटारपंप सुरू करण्याची प्रक्रिया त्यांनी यशस्वी करून दाखवली आहे. यामुळे याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
ते सध्या या मोटारपंपाच्या सहायाने पाण्याचा उपसा करून शेती सिंचित करीत आहे. त्यांच्या या यशस्वी प्रयोगामुळे इतर शेतकऱ्यांपुढेही वीज निर्मितीचा नवीन मार्ग तयार झाला आहे. कधीही खंडीत होणाऱ्या विजेला पर्याय म्हणून ट्रॅक्टरच्या सहायाने जनरेटर चालवून शेतीला सिंचन पुरवण्याची कल्पना माझ्या डोक्यात आली. त्या अनुषंगाने मी प्रयोग करून यशस्वी करून दाखविला.
इतर शेतकऱ्यांनीही अशाप्रकारे प्रयोग करून स्मार्ट शेती केल्यास नक्कीच फायदेशीर ठरेल, असे रविंद्र बुरडे यांनी म्हटले आहे. यामुळे सध्या राज्यात या यशस्वी प्रयोगाची चर्चा सुरु आहे. दरम्यान अनेक शेतकरी शेतीमध्ये अनेक प्रयोग केले जात आहेत. यामुळे सध्या शेतीमध्ये आधुनिकता आली आहे. यामुळे भविष्यात अनेक बदल होतील.
महत्वाच्या बातम्या;
साहेब खिशात पैसा नाही म्हणून तुम्हाला भीक मागतोय, आम्हाला फक्त लाईट द्या, शेतकरी ढसाढसा रडला
Fertilizer: खरिपाच्या तोंडावर खतांच्या किंमतीमध्ये मोठी वाढ, शेतकऱ्यांनो 'हे' दर बघूनच खरेदी करा..
अपघातात मृत्यू झाल्यास शेतकऱ्यांच्या घरच्यांना मिळतात २ लाख, योजनेमुळे अनेक शेतकऱ्यांची कुटूंब सावरली..
Published on: 06 April 2022, 12:41 IST