News

शेतकरी हा जगाचा पोशिंदा समजला जातो. परंतु असे असले तरी बहुतेक शेतकरी सुशिक्षित नसतात. यामुळे बऱ्याचदा शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते किंवा सरकारी कामात अडवणूक केली जाते. ही अडवणूक होऊ नये म्हणून शेतकऱ्यांना शासनाने दिलेले हक्क व सवलतींबद्दल माहिती असणे गरजेचे आहे.

Updated on 20 April, 2023 10:54 AM IST

शेतकरी हा जगाचा पोशिंदा समजला जातो. परंतु असे असले तरी बहुतेक शेतकरी सुशिक्षित नसतात. यामुळे बऱ्याचदा शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते किंवा सरकारी कामात अडवणूक केली जाते. ही अडवणूक होऊ नये म्हणून शेतकऱ्यांना शासनाने दिलेले हक्क व सवलतींबद्दल माहिती असणे गरजेचे आहे.

सात-बारावर विहीर,पीक पाहणी नोंद करण्यास कसलेही शुल्क आकारले जात नाही.
सात- बारा, ८-अ व इतर अधिकार अभिलेख हे सार्वजनिक दस्त असल्याने त्याचे उतारे कोणासही मिळू शकतात. चतुःसीमा / बाकी नसलेला दाखला तलाठ्याकडून त्वरित मोफत मिळतो.
सात-बारा व ८-अ खाते उतारा मिळवण्यासाठी एका वर्षासाठी रु.५ भरून सध्या कागदावर अर्ज तलाठ्यास दिल्यास २४ तासांत उतारा देणे बंधनकारक आहे.

सदर उतारे रु.२० प्रति उतारा भरून तालुका कार्यालयातून संगणकावर ताबडतोब मिळू शकतात. त्यासाठी एक छोटा छापील अर्ज भरावा लागतो.
जमिनीचे आपले संपूर्ण रेकॉर्ड सात-बारा, ८-अ, फेरफार नोंदी, ६-ड उतारे आपल्याकडे मोफत पाहता येतात.
तालुका अभिलेख कक्षातील १९२५ ते ३० पासूनचे संपूर्ण रेकॉर्ड विनंतीवरून मोफत पाहता येते. तसेच माहितीच्या अधिकारात तपासता देखील येते.
गावचे सर्व सात-बारा www. mahaabhulekh.mumbai.nib.in या साईटवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

शेतात जाण्या-येण्यासाठी शेताच्या बांधावरून वापर करण्याचा अधिकार शेतकऱ्याला असतो.वहिवाटीच्या रस्त्यास तसेच बांधावरून जाण्यास अडथळा केल्यास तहसीलदार वाट काढून देऊ शकतात.

ॲपल बोर खाल्याने 65 मेंढ्यांचा मृत्यू, मेंढपाळाला मोठा आर्थिक फटका..

शेतात जाण्या-येण्यासाठी शेताच्या बांधावरून वापर करण्याचा अधिकार शेतकऱ्याला असतो.वहिवाटीच्या रस्त्यास तसेच बांधावरून जाण्यास अडथळा केल्यास तहसीलदार वाट काढून देऊ शकतात.
कलम ८५ महाराष्ट्र महसूल अधिनियम १९६६ प्रमाणे शेतजमिनीचे वाटप तहसीलदारांकडून मोफत होते ; मात्र त्यासाठी सर्व संबंधितांत एकोपा असावा असे प्रतिज्ञापत्र कच्च्या वाटपासहित सादर केल्यास मोफत वाटप करून मिळते.
शेतजमीन खरेदीची नोंद सात-बारा मोफत होते.उपनिबंधकाच्या कार्यालयातून अ-पत्रक व इंडेक्स ।। दर पंधरवड्यास तलाठ्याकडे रवाना होते. त्याचे प्रति शेतकरीही तलाठ्यास देऊन पोच घेऊ शकतात. १५ दिवसांत फेरफार रजिस्टरला नोंद घेऊन, घेणार व विकणार यांना नोटिसा बजावणे हे तलाठयाचे काम असून ते मोफत होते.
नोंद झाल्यानंतर सदर नोंदीची सात-बारावर दुरुस्ती होऊन दुरुस्त सातबारा मोफत मिळणे हा शेतकऱ्याचा हक्क आहे.

नोकरी सोडून युवतीने सुरु केला पोल्ट्री व्यवसाय, आता कमवतेय लाखो रुपये..

शेतजमीनीच्या खरेदी-विक्री व्यवहारात शासनाने ठरवलेल्या किमती प्रमाणेच व्यवहार करावा. या किमती पाहण्यासाठी सबरजिस्ट्रार कार्यालयात मोफत उपलब्ध असतात.
शेतजमिनीचे वारस वाटप सर्वांची संमती असल्यास रु.१०० च्या स्टॅम्पवर सबरजिस्ट्रारच्या कार्यालयात नोंदणीकृत होऊ शकते.वाटणी प्रमाणे सात-बारावर नोंद करवून घ्यावी.

फळांच्या राजाला वाचवा, बदलत्या हवामानात हापूस आंब्याचे ५० ते ८५ टक्क्यांपर्यंत उत्पादन घटले..
उन्हाळी भुईमुग किडींचे एकात्मिक व्यवस्थापन, शेतकऱ्यांनो जाणून घ्या...
काळ्या आंब्याची लागवड आहे फायदेशीर, बाजारात आहे खुपच मागणी..

English Summary: Farmers, do you know your important rights? It will be beneficial to know
Published on: 20 April 2023, 10:54 IST