News

लातूर: गेल्या काही आठवड्यांपासून पावसाला चांगली सुरुवात झाली आहे त्यामुळे आता प्रत्येक शेतकरी पेरणीच्या कामची लगबग करत आहे. कृषी विभागाने आवाहन केल्याप्रमाणे बियाण्यांसाठी ऑनलाईन नोंदणी देखील करत आहे.

Updated on 19 June, 2021 12:08 PM IST

लातूर: गेल्या काही आठवड्यांपासून पावसाला चांगली सुरुवात झाली आहे त्यामुळे आता प्रत्येक शेतकरी पेरणीच्या कामची लगबग करत आहे. कृषी विभागाने आवाहन केल्याप्रमाणे बियाण्यांसाठी ऑनलाईन नोंदणी देखील करत आहे. मात्र ऑनलाईन नोंदणी करूनही काही उपयोग होत नसल्याचे दिसत असून पेरणीची कामे खोळंबली आहे. लातूर जिल्ह्यात असलेल्या औसा तालुक्यातील शेतकऱ्यांना बियाणे मिळत नाही. त्यांनी ऑनलाईन नोंदणी करूनही विक्रेत्यांकडून बियाणे उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे.

याच पार्श्वभूमीवर आमदार अभिमन्यू पवार यांनी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांना निवेदन दिले आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना प्रमाणित परमिटचे महाबीज बियाणे शेतकऱ्यांना तातडीने वितरित करण्याची मागणी आमदार पवार यांनी त्या निवेदानातून केली आहे.

औसा व निलंगा तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप २०२१ साठी सोयाबीन व इतर बियाणे मिळवण्यासाठी कृषी विभागाच्या आवाहनानुसार ऑनलाईन नोंदणी केली. ऑनलाईन सोडत निघून निवड झालेल्या शेतकऱ्यांना महाबीजच्या अधिकृत विक्रेत्यांकडून बियाणे घेण्यासाठी परमिटही देण्यात आले.

 

मात्र शेतकरी बियाणे घेण्यास गेले असता बियाणे उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे, ज्यामुळे ऐन पेरणीच्या वेळी शेतकरी बांधवांची अडचण झालेली आहे. बियाणे परमिट मिळालेल्या शेतकऱ्यांना तातडीने बियाणे उपलब्ध करून द्यावे. 

महाबीज बियाणे वितरणातील गैरव्यवहाराची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांच्याकडे काल निवेदनाद्वारे करण्यात आली असल्याची माहिती आमदार अभिमन्यू पवार यांनी दिली आहे.

English Summary: farmers did not get seeds even after registration
Published on: 19 June 2021, 12:08 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)