News

शास्रज्ञ,कृषी अधिका-यांसह स्वाभिमानी कडुन टोमॅटो पिकाची पाहणी

Updated on 26 August, 2022 8:26 PM IST

शास्रज्ञ,कृषी अधिका-यांसह स्वाभिमानी कडुन टोमॅटो पिकाची पाहणी चिखली--तालुक्यातील तेल्हारा येथील शेतक-याने सिजेंटा कंपनीचे टोमॅटो रोपांची लागवड शेतामधे केली होती.परंतु दरवर्षी प्रमाणे झाडांना फळधारणा होत नसल्याचे दिसुन आल्याने फसवणुक झाल्याची तक्रार शेतकरी मोतीराम कुटे व रमेश कुटे यांनी कृषी विभागाकडे केली असुन तात्काळ पंचनामा करुण नुकसान भरपाई देण्यात यावी,अशी मागणी करण्यात आली आहे.दरम्याण कृषी विद्यापीठ सलग्न

असलेल्या कृषी विज्ञान केंद्राचे वरीष्ठ शास्त्रज्ञ व कृषी अधिकारी यांनी शेताची पाहणी केली असुन नुकसानीचा पंचनामा देखील करण्यात आला आहे.तेल्हारा येथील शेतकरी मोतीराम भगवान कुटे हे दरवर्षी शेतामधे भाजीपाला लागवड करतात तर त्यांनी यावर्षी चव्हाण रोपवाटिका येथुन सिजेंटा कंपनी २०४८वाणाचे टोमॅटो रोपे घेत टोमॅटो पिकाची लागवड एक एकर शेतामधे केली होती.शेतीमशागत,लागवडीसाठी मोठा खर्च त्यांनी केला परंतु लागवडी नंतर झाडांना रासायनिक खते,किटकनाशके औषध फवारणी नंतर सुद्धा

फळधारणा कमी प्रमाणात असल्याचे दिसुन आल्याने याबाबत शेतक-यांने कंपनी प्रतिनिधी व रोपवाटिकेस कळविले परंतु वातावरण बदलामुळे असे होऊ शकते असे म्हणत औषध फवारणी करण्याचा सल्ला दिल्याने शेतक-यांने शेतात फवारणी सुद्धा केली परंतु दरवर्षी च्या तुलनेत लागवडीस अडीच महिणे उलटुनही टोमॅटोला फळधारणा होतांना दिसत नसल्याने व केलेली मेहनत व खर्च वाया जातांना दिसत असल्याने सिजेंटा कंपनीकडुन टोमॅटो रोपात फसवणुक झाल्याची तक्रार शेतक-यांने

जिल्हाधिकारी,जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी व तालुका कृषी विभागाकडे केली असुन तात्काळ शेताची पाहणी व पंचनामा करुण नुकसान भरपाई देण्यात यावी,अशी मागणी केली होती.It was demanded that Panchnama Karun compensation should be given.दरम्याण तक्रारीची तातडीने दखल घेत दि२४/०८/२०२२रोजी कृषी विज्ञान केंद्राचे वरीष्ठ शास्त्रज्ञ डॉ ए एस तारु,तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे,कृषी अधिकारी संदिप सोनुने यांच्यासह मंडळ कृषी

अधिकारी,कृषी सहाय्यक व स्वाभिमानी चे विनायक सरनाईक यांनी शेतक-यांसह टोमॅटो पिकाची पाहणी केली तर अधिका-यांकडुन रॅडम पध्दतीने झाडांच्या फळांची संख्या घेत पंचनामा देखील करण्यात आला आहे.तर यामधे झाडांना ७०ते८०टक्के फळधारणा कमी असल्याचे तर प्रत्यक्ष पाहणीमधे झाडांमधे २०ते३०टक्के एवढि भेसळ असल्याचे समोर आले

आहे.यावेळी डॉ पंदेकृविचे मा सदस्य तथा स्वाभिमानी चे विनायक सरनाईक,कृषी मंडळ अधिकारी डी बी गवते,कृषी सहाय्यक सौ वाकोडे,कंपनी प्रतिनिधी संजय सोळंकी,मोतीराम कुटे,रमेश कुटे,गजानन कुटे,गुलाबराव कुटे,एकनाथ कुटे यांच्यासह शेतकरी उपस्थीत होते.

English Summary: Farmers defrauded by Sygenta; damages sought
Published on: 26 August 2022, 08:26 IST