शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची सरकारची योजना आहे, ती आता साकार होईल अशी आशा आहे. कारण बरेच शेतकरी आता काळा गावाचे लागवड करून आपले उत्पन्न दुप्पट करण्यात यशस्वी होताना दिसत आहेत. बरेच महिला गट व्यापारी तत्त्वावर शेती करून आपले उत्पन्न वाढवीत आहेत. आताचा काळ हा गव्हाच्या लागवडीसाठी व्यवस्थित योग्य आहे. ३० नोव्हेंबरपासून लागवडीसाठीचा योग्य वेळ आहे. त्यादृष्टीने काळ्या गव्हाची लागवड करण्यासाठीची तयारी सुरू करण्यात आली आहे. अनेक शेतकरी काळ्या गव्हाच्या उत्पन्नातून मोठा पैसा कमावत आहेत. उत्तर प्रदेशातील मोहन लालगंजमधील राम रती यांनी या गव्हाचे उत्पन्न घेतले आहे, राम रती हे गव्हाची पॅकिंग करुन याची विक्री करत असतात, याविषयीचे वृत्त एका हिंदी वृत्तसंस्थेने दिले आहे. राम रती यांनी
शिव किसान प्रोड्युसर कंपनी सोबत करार करून काळ्या गव्हाची पॅकिंग करून दिवसाला तीनशे ते चारशे रुपये कमाई करतात. त्यांच्यासोबत बऱ्याच महिला या कामांमध्ये जोडले गेले आहेत. यामध्ये बहुतेक महिला स्वतःचा समूह बनवून सोबत मशरूम आणि अगरबत्ती बनविण्याचे काम ही करत आहेत. काळा गव्हाच्या सीजन नंतर पूर्ण वर्षापर्यंत हे काम या महिला करतात. महिलांच्या आर्थिक विकासामध्ये व्यापारी शेती हा एक फायदेशीर व्यवसाय आहे.
उप कृषी निदेशक डॉ. सीपी श्रीवास्तव यांनी माध्यमांना सांगितले की सरकारच्या योजनेनुसार काळ्या गव्हाचे उत्पादन हे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी महत्त्वाचे आहे. उत्तर प्रदेशमधील मोहनलालगंज क्षेत्रामध्ये काळ्या गव्हाच्या शेतीसोबत गव्हाचं बीज तयार केले जातं. काळ्या गहू इतर गव्हाच्या तुलनेने जास्त पौष्टिक असतो. काळात गव्हाच्या मार्केटमध्ये ३ हजार २०० रुपये ते ४ हजार प्रति क्विंटलपर्यंत विकला जातो. बऱ्याचशा महिला यामध्ये काम करून स्वतःचे उत्पन्न वाढवित आहेत. लागवडीसाठी १२५ ते १५० किलो ग्रॅम प्रति हेक्टर गव्हाचे बी लागते.
काळ्या गव्हाच्या बाबतीत राबवले जात आहे जागरूकता अभियान
जिल्हा कृषी अधिकारी ओ पी मिश्रा यांनी सांगितले की, काळ्या गव्हाच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना जागृत केले जात आहे. कृषी कार्यक्रमांच्या माध्यमातून या गव्हाच्या लागवडीविषयी आणि त्याचा फायद्याविषयी माहिती दिली जात आहे. कृषी वैज्ञानिकांनी या गव्हाला अधिक पौष्टिक असल्याचे म्हटले. या गव्हामध्ये लोहाची भरपूर मात्रा असते. ओपन मार्केटमध्ये याची किंमत साधारण गव्हापेक्षा जास्त असते. लागवडीसाठीचा खर्च हा मात्र २० ते ३० टक्के जास्त येतो, परंतु बाजारामध्ये भावही चांगला मिळतो.
Published on: 05 November 2020, 06:07 IST