News

परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे यावर्षी हातातोंडाला आलेली पिके जमीनदोस्त झाली. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. यामुळे आता विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी ओला दुष्काळ (Wet Drought) जाहीर करून मदत केली पाहिजे, अशी मागणी केली आहे.

Updated on 19 December, 2022 1:25 PM IST

परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे यावर्षी हातातोंडाला आलेली पिके जमीनदोस्त झाली. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. यामुळे आता विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी ओला दुष्काळ (Wet Drought) जाहीर करून मदत केली पाहिजे, अशी मागणी केली आहे.

सध्या शेतकरी कर्जाच्या (Farmer Loan) ओझ्याने कोलमडला आहे. त्यामुळे आत्महत्या (Farmer Suicide) होत आहेत. शेतकऱ्यांना या संकटातून काढायचे असेल तर राज्यात ओला दुष्काळ (Wet Drought) जाहीर करून मदत केली पाहिजे, ‘यंदा राज्यातला शेतकरी संकटात आहे. अतिवृष्टीने अनेक भागात पिके वाहून गेली आहेत.

शेतजमिनी खरवडून गेल्याने नापिक झाल्या आहेत. पशुधन वाहून गेल्याने आर्थिक नुकसान झाले आहे. खरिपाबरोबर रब्बीचा हंगाम वाया गेला आहे. कापूस, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, तीळ, मका, उडीद, मूग, तूर, धान, संत्रा पिकांचे झालेलं नुकसान प्रचंड आहे. विमा कंपन्यांकडून शेतकऱ्याची पिळवणूक होत आहे. पीक विम्याचे दावे मोठ्या प्रमाणावर नाकारण्यात आले असून प्रलंबित दाव्यांची संख्याही मोठी आहे.

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या जवळच्या लोकांच्या कारखान्यांना बिनव्याजी मदत

दररोज तीन शेतकरी आत्महत्या करत आहेत. या संकटातून शेतकऱ्याला बाहेर काढायचं असेल तर, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख, फळपिकांना हेक्टरी दीड लाख रुपयांची मदत जाहीर करावी. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी.

गायीचे दूध 90 रुपये, म्हशीचे दूध 100 रुपये प्रतिलिटर दराने पशुपालकांकडून खरेदी करण्याची तयारी

विदर्भाचा विकास व्हावा यासाठी गोसी खुर्द प्रकल्प शरद पवार यांनी कृषिमंत्रीपदाच्या काळात आणला. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी हा प्रकल्प राज्यात असूनही त्याला शरद पवार यांच्या आग्रहास्तव राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा दिला. तरीही भाजपचे नेते खोटे बोलत आहेत,क असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या;
ड्रोन विकत घेण्यासाठी सरकार 4 लाख रुपये देणार, शेती करणे होणार सोपे
विहिरीसाठी 4 लाख फिक्स! मान्यतेसाठी 'बीडीओ' ना अधिकार, ग्रामसभेत मंजुरी देणे बंधनकारक
जळगाव दूध संघाच्या चेअरमनपदी निवड झाल्यानंतर मंगेश चव्हाणांनी केलं 'हे' काम, एकनाथ खडसे याचा फोटो..

English Summary: 'Farmers collapse under debt burden, three suicides every
Published on: 19 December 2022, 01:25 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)