News

मराठवाडयात गोगलगाईच्या प्रार्दुभावामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर कापूस, सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. यावरुन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली आहे. गोगलगाईंचे उच्चाटन करण्यात सरकारी यंत्रणांना अपयशी ठरली आहे.

Updated on 15 October, 2023 3:00 PM IST

मराठवाडयात गोगलगाईच्या प्रार्दुभावामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर कापूस, सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. यावरुन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली आहे. गोगलगाईंचे उच्चाटन करण्यात सरकारी यंत्रणांना अपयशी ठरली आहे. यामुळे कापूस, सोयाबीन पिकांचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांची सरकारने फसवणूक केल्याचे समोर आले आहे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

कापसाचा दर्जा चांगला असताना ५४०० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी केली जात आहे. तर सोयाबीनचा हमीभाव ४६०० रुपये आहे, मात्र यापेक्षा ५०० ते ७०० रुपये कमी भाव शेतकऱ्याला मिळत आहे. त्यामुळे सरकारने हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करणाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

मराठवाडयात ५५ हजार हेक्टर क्षेत्राला गोगलगाईचा फटका बसला आहे. त्यामुळे मराठवाडयातील शेतकरी संकटात सापडला असून या शेतकऱ्यांसाठी सरकारने उपाययोजना केल्या पाहिजेत अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली आहे.

English Summary: Farmers cheated by the government purchase at a price below the guaranteed price - Vijay Vadettiwar
Published on: 15 October 2023, 03:00 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)