News

मागील अनेक महिन्यांपासून कृषी कायद्याला शेतकऱ्यांचा विरोध असून दिल्ली-हरियाणा च्या सीमेवर आंदोलन सुरू आहे आणि त्याच्यामुळे शेतकरी संघटनेने २७ सप्टेंबर या तारखेला भारत बंद असणार आहे अशा प्रकारची हाक दिलेली आहे.भारत बंद हाकेला हरियाणा प्रदेश व्यापार मंडळाने सुद्धा पाठिंबा दिलेला आहे तसेच हरियाणा मधील बाजार समित्या सुद्धा बंद राहणार आहेत अशी माहिती हरियाणा प्रदेश मंडळाचे प्रांतीय अध्यक्ष बजरंग गर्ग यांनी दिलेली आहे.

Updated on 26 September, 2021 1:24 PM IST

मागील अनेक महिन्यांपासून कृषी कायद्याला शेतकऱ्यांचा विरोध असून दिल्ली-हरियाणा च्या सीमेवर आंदोलन सुरू आहे आणि त्याच्यामुळे शेतकरी संघटनेने २७ सप्टेंबर या तारखेला भारत बंद असणार आहे अशा प्रकारची हाक दिलेली आहे.भारत बंद हाकेला हरियाणा प्रदेश व्यापार मंडळाने सुद्धा पाठिंबा दिलेला आहे तसेच हरियाणा मधील बाजार समित्या सुद्धा बंद राहणार आहेत अशी माहिती हरियाणा प्रदेश मंडळाचे प्रांतीय अध्यक्ष बजरंग गर्ग यांनी दिलेली आहे.

२७ सप्टेंबर रोजी चार वाजेपर्यंत बाजार समित्या पूर्ण बंद राहतील:

जो अन्यायी कृषी कायदा केलेला आहे त्या कायद्यामुळे शेतकरी तसेच व्यापारी वर्गाचे नुकसान होणार आहे तर खाजगी बाजार समित्यांना फायदा होईल.२७ सप्टेंबर रोजी शेतकरी संगटनेने जो भारत बंद अशी हाक पुकारलेली आहे या हाकेला हरियाणा प्रदेश मंडळाने सुद्धा समर्थन देऊन बाजार समित्यांचा सुद्धा संप राहील असे सांगितले आहे.२७ सप्टेंबर रोजी चार वाजेपर्यंत बाजार समित्या पूर्ण बंद राहतील तसेच व्यापार मंडळ सुद्धा या संपात सहभागी राहणार आहेत अशी माहिती अध्यक्ष बजरंग गर्ग यांनी शेतकरी व अधिकाऱ्यांशी बोलताना दिलेली आहे.

हेच वाचा:सांगोला तालुक्यात राज्यातील सर्वात दुसरे मोठे उभारले शीतगृह, शेतकऱ्यांसाठी फायदेशीर

बजरंग गर्ग यांनी असेही सांगितले की अनेक वर्षांपासून शेतकरी वर्ग आणि व्यापारी वर्गात चांगले संबंध आहेत ते फक्त व्यवहार पुरतेच नाही तर  दोघांमध्ये  कौटुंबिक  संबंध  सुद्धा  चांगले आहेत आणि हेच चांगले हितसंबंध जपायचे आहेत मात्र सरकार या दोघांमध्ये जे बंधुत्व आहे ते बिघडवत आहेत.केंद्र सरकारच्या या कृषी कायद्यामुळे देशातील तसेच राज्यातील ज्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांना खाजगी समित्या उभा करण्याचे अधिकार येणार आणि यामुळे ज्या सरकारी बाजार समित्या आहेत त्या बंद पडणार आहेत.

साठेबाजी करून कंपन्या प्रचंड नफा कमावतील:-

बजरंग गर्ग म्हणले की देशात जर तीन कृषी कायदे लागू केले तर अन्न धान्यवरील साठा मर्यादा रद्द केला जाईल आणि साठा मर्यादा रद्द झाली तर देशातील मोठ्या मोठ्या कंपन्या फळे तसेच पालेभाज्या सारखे धान्याचा साठा करतील आणि यामधून मोठ्या प्रमाणात नफा कमवतील.शेतकऱ्यांकडून अगदी कमी किमतीत या मोठ्या कंपन्या पिके खरेदी करतील आणि यामुळे थोड्याच दिवसात शेतकरी वर्ग तसेच व्यापारी वर्ग पूर्णपणे संपुष्टात येतील.

शेतकऱ्यांशी संवाद साधावा:-

बजरंग गर्ग यांनी मोदींना तीन कृषी कायद्यांची समस्या सोडवण्याचे आवाहन केले आहे जे की यामध्ये शेतकरी वर्ग, व्यापारी वर्ग तसेच देशाचे सुद्धा हित आहे. तुम्ही शेतकऱ्यांशी या बाबत संवाद करावा आणि देशाची अर्थव्यवस्था सुधारावी असे गर्ग म्हणले आहेत.

English Summary: Farmers call for India shutdown on September 27. MarkeHaryanaHaryana will remain closed
Published on: 26 September 2021, 01:19 IST