आपण बघतो की अनेकदा समाजात फसवणुकीच्या घटना घडत असतात. आता मात्र चक्क शेतकऱ्यांची जमीन परस्पर विकल्याचा आरोप करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांवर हा आरोप करण्यात आला आहे. आता या अदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी परत देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.
यासाठी स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्यासह पीडित आदिवासी शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. याबाबत शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत हे अधिकारी परस्परच कागदपत्रावर खाडाखोड करुन संबंधित लोकांना जमिनीचा हावाला देत आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
आदीवासी भागातील शेतकरी हे जास्त शिक्षित नाहीत. त्यांना जमिनीच्या व्यवहारातील जास्त माहिती देखील नाही. यामुळे त्यांना कागदांचा खेळ लक्षात येत नाही. याचाच फायदा महसूलच्या अधिकाऱ्यांनी घेऊन या शेतकऱ्यांच्या जमिनी परस्पर विकल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे आता काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सुरुवातीला तर आपल्या शेतजमिनी विकल्याची माहितीही या शेतकऱ्यांना नव्हती. जमिन कसायला गेल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे संग्रामपूर तालुक्यातील चिचारी येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. कागदपत्रांवर खडाखोड करुन महसूलच्या अधिकाऱ्यांनी हे काम केले आहे. यामुळे आता हा शेतकरी आक्रमक झाले आहेत.
याबाबत संग्रामपूर तालुक्यातील चिचारी येथील शेतकऱ्याच्या शेतजमिनीवर काही लोकांनी कब्जा केला आहे. हा सर्व प्रकार शेतकरी जमिन कसायला गेल्यानंतर समोर आला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी याबाबत विचारणा केली, तेव्हा त्यांना धक्काच बसला. यामुळे आता हे शेतकरी आमरण उपोषणाला बसले असून त्यांनी आपल्या जमिनी परत करण्याची मागणी केली आहे.
महत्वाच्या बातम्या;
अतिरिक्त उसाचे अनेकांनी केले सोने, कारखान्यावर चकरा न मारता कमवले लाखो, जाणून घ्या कसे...
PM Kisan Scheme; 11व्या हप्त्याचे 2000 रुपये हवे आहेत? मग बातमी वाचून करा हे काम, नाहीतर पैसे येणार नाहीत
ठाकरे सरकारने अखेर निर्णय घेतलाच!! शेतकऱ्यांना कोर्टकचेरीतून मोठा दिलासा..
Published on: 29 March 2022, 10:14 IST