News

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात एक योजनाच सुरु केली आहे. यामुळे याची चर्चा सुरु आहे. त्यांनी चालता फिरता डिझेल पंपामुळे (Diesel Pamp) ग्राहकांना पेट्रोल पंपावरील दरातच थेट गावात, वाड्यावस्त्यांवर डिझेल मिळू लागल्याने ग्राहक विशेष करून शेतकऱ्यांची चांगलीच सोय केली आहे.

Updated on 10 April, 2022 4:27 PM IST

हिंदुस्थान पेट्रोलियमने सध्या आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात एक योजनाच सुरु केली आहे. यामुळे याची चर्चा सुरु आहे. त्यांनी चालता फिरता डिझेल पंपामुळे (Diesel Pamp) ग्राहकांना पेट्रोल पंपावरील दरातच थेट गावात, वाड्यावस्त्यांवर डिझेल मिळू लागल्याने ग्राहक विशेष करून शेतकऱ्यांची चांगलीच सोय केली आहे. यामुळे याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे.

आपण बघतो की, शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी डिझेल (Farmer Tractor Diesel) आणण्यासाठी पेट्रोल पंपावर जायचे झाल्यास वेळेचा अपव्यय होत होता तसेच जाण्या येण्यासाठी खर्च होत होता जेसीबी, पोकलन व्यावसायिकांना डिझेलसाठी दूर अंतरावरील पेट्रोल पंपावर जावे लागत असल्याने वेळेचा व पैशाचा अपव्यय होत होता. यामुळे आता शेतकऱ्यांसह अनेकांना याचा सध्या फायदा होत आहे.

येथील लाखणगाव, रोडेवाडी फाटा, खडकवाडी, धुमाळस्थळ, वाळुंजनगर, लोणी, धामणी, वडगावपीर, मांदळेवाडी, रानमळा या गावातील नागरिक व शेतकऱ्यांना डिझेल अथवा पेट्रोलसाठी सुमारे ७ ते १० किलोमीटर अंतरावरील मेंगडेवाडी, पारगाव, पाबळ, कवठे येथील पेट्रोल पंपावर जावे लागते. यामुळे यासाठी जास्तीचे पैसे आणि वेळही जात होता. आसपास कुठे पंप नसल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत होती.

हिंदुस्थान पेट्रोलियमने पीव्हीपी.( Hindustan Petroliyam PVP) पेट्रोल पंप (जांबूत) यांचा माध्यमातून ही सोय करण्यात आली आहे. आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागातील ज्या गावात पेट्रोल पंप नाही अशा ठिकाणी ही सोय करण्यात आली आहे. यामध्ये रोडेवाडी फाटा, खडकवाडी, धुमाळस्थळ, वाळुंजनगर, लोणी, रानमळा आदी गावात चालता फिरता डिझेल पंपामुळे (मोबाईल टॅकर) पेट्रोल पंपावरील दरातच थेट गावातच डिझेल मिळू लागले आहे.

असे असताना ग्राहकांचा देखील याला चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे. अगदी गरजेच्यावेळी आणि त्याच दरात पेट्रोल मिळत असल्याने कोणाचीही काहीच तक्रार नाही. येणाऱ्या काळात असाच प्रयोग इतर ठिकाणी झाल्यास याचा सगळ्यांनाच चांगला फायदा होणार आहे.

महत्वाच्या बातम्या;
आता कोंबडी पालन करण्यासाठी सरकार देतंय ५० टक्के अनुदान, 'असा' घ्या लाभ
शेळीपालन व्यवसायात दूध उत्पादन करून कमवा लाखो रुपये, जाणून घ्या 'त्या' शेळीची माहिती..

English Summary: Farmers benefit from mobile petrol pumps, they get petrol at home.
Published on: 10 April 2022, 04:26 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)