सध्या रोडची अनेक कामे सुरू आहेत. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या यासाठी जमिनी गेल्या आहेत. असे असले तरी त्यांना याचे मोठ्या प्रमाणावर पैसे मिळाले आहेत. पुणे बेंगलोर एक्सप्रेस वे हा प्रकल्प देखील भारतमाला परीयोजनेचा एक भाग आहे.
हा महामार्ग महाराष्ट्रातील पुणे, सांगली आणि सातारा या तिन्ही जिल्ह्यातून जाणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी देखील गेल्या आहेत. ज्या गावातून जाणार आहे तिथे लवकरच भूसंपादनाची प्रक्रिया केली जाणार आहे.
काही लोकांनी हा ग्रीनफिल्ड कॉरिडॉर राहणार असल्याने शेतकऱ्यांच्या जमीनी खरेदीचा सपाटा सुरू केला आहे. पुणे बेंगलोर एक्सप्रेस वे साठी शासनाकडून 50 हजार कोटी रुपये खर्च होणे अपेक्षित आहे. यामुळे शेतकऱ्यांना देखील मोठा मोबदला दिला जाणार आहे.
ऊस बिले थकवणाऱ्या कारखान्याच्या संचालकांवर गुन्हा दाखल
पुणे बेंगलोर ग्रीन फील्ड एक्सप्रेस वे ज्या गावातून जाणार आहेत त्या गावांची नावे निश्चित झाली आहे. जिल्हाधिकार्यांकडून लवकरच सदर महामार्गासाठी आवश्यक भूसंपादनाची प्रक्रिया करणे हेतू अधिसूचना जारी होणार आहे. यामुळे याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
घोडगंगा सहकारी कारखान्यात राष्ट्रवादीच्या पॅनलचे वर्चस्व, विरोधकांना धक्का
ज्या गावातून महामार्ग जाणार आहे त्या गावातील जमिनीला करोडो रुपयांचा भाव मिळत आहे. जी जमीन हजारो रुपयांमध्ये विक्री होत होती त्या जमिनीला लाखो रुपयांचा भाव आला आहे. हजारो रुपये गुंठा दराने विक्री होणारी जमीन तब्बल पाच ते सात लाख रुपये गुंठा दरात जमीन विक्री होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या;
"कारखान्याच्या वजनकाट्यात एक किलोचा फरक पडला तरी एक लाखाच बक्षीस देणार"
साखर निर्यात कोट्यात महाराष्ट्रावर अन्याय, उत्तर प्रदेशला जास्त कोटा...
महाराष्ट्राची दिल्ली होणार? महाराष्ट्र डेंजर झोनकडे, धूलिकणांचे प्रदूषणामुळे दिला धोक्याचा इशारा
Published on: 08 November 2022, 03:31 IST