News

सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने त्याचा सरळ परिणाम दक्षिणेकडील राज्यांना होणार असून महाराष्ट्रात देखील याचा परिणाम पाहायला मिळू शकतो असा अंदाज हवामान खात्याने बांधला आहे. यामुळे आगामी दोन दिवस राज्यातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. सध्या मुंबई ठाणे समवेतच कोकणातील काही जिल्ह्यात ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे.

Updated on 22 March, 2022 9:37 PM IST

मागील वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी राजा मेटाकुटीला आला आहे आणि आता रब्बी हंगाम (Rabbi Season) अंतिम टप्प्यात असताना पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे (Untimely Rain) सावट डोकावून पाहत असल्याने बळीराजाची चिंता वाढणार आहे. भारतीय हवामान खात्याकडून (Indian Meteorological Department) बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने त्याचा सरळ परिणाम दक्षिणेकडील राज्यांना होणार असून महाराष्ट्रात देखील याचा परिणाम पाहायला मिळू शकतो असा अंदाज हवामान खात्याने बांधला आहे.

यामुळे आगामी दोन दिवस राज्यातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. सध्या मुंबई ठाणे समवेतच कोकणातील काही जिल्ह्यात ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे.

हे पण वाचा:-Pm Kisan: ई-केवायसी झाली नाही तरी मिळतील का 2000 रुपये? वाचा काय आहेत शेतकऱ्यांच्या अडचणी

हवामान खात्याकडून सांगितले गेले आहे की, चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर कुठलाच डायरेक्ट प्रभाव पडणार नाही मात्र यामुळे पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रातील काही भागात वातावरणात बदल देखील नोंदविला गेला आहे अनेक जिल्ह्यात सध्या ढगाळ वातावरण बनले आहे.

आज रात्री दक्षिण मध्य महाराष्ट्रात आणि 23, 24 आणि 25 या तारखेला दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. एकंदरीत आगामी काही दिवसात दक्षिण कोकणात हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सऱ्या बघायला मिळू शकतात.

हे पण वाचा:-आनंदाची बातमी! सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार; मार्चअखेरपर्यंत 200 कोटींची कर्जमाफी

कोकणात तयार झालेल्या ढगाळ वातावरणामुळे आंबा समवेतच काजू पिकाला मोठा फटका बसत असून आंब्याचे मोहोर काळवंडत असून त्याची गळ गळती देखील होतं आहे. ढगाळ वातावरणामुळे कोकणातील बागायतदार हवालदिल बघायला मिळत आहेत.

तर दुसरीकडे विदर्भ आणि मराठवाड्यात उन्हाचा कडाका हा कायम असून तापमान याच पद्धतीने कायम राहील असे सांगितले जात आहे. विदर्भ समवेतच मराठवाड्यात उन्हाच्या तडाख्यामुळे तर कोकणात ढगाळ वातावरणामुळे मानवी आरोग्य बिघडू शकते त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन देखील यावेळी करण्यात आले.

महत्वाची बातमी:-चेरी टोमॅटोची लागवड करा आणि मिळवा दर्जेदार उत्पादन; वाचा याविषयी

English Summary: Farmers, be careful! The next three days are rainy; Untimely arrival in 'Ya' district
Published on: 22 March 2022, 09:37 IST