सध्या गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. आता आज हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज पुण्यात पावसाला सुरुवात झाली आहे. पुणे शहरासह जिल्ह्यातील बारामती इंदापूरमध्ये वाऱ्यासह पाऊस पडत आहे.
महाराष्ट्राच्या अंतर्गत भागातून कमी दाबाचा पट्टा जात आहे. त्यामुळे पुढील काही दिवस ढगाळ वातावरणात वाढ होण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवेतील आर्द्रता आणि दिवसा तापमानात वाढ झाल्याने वातावरण अस्थिर झाले आहे.
गेल्या तीन-चार दिवसांपासून कमाल तापमानात घट झाल्याने पुणेकर नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सध्या पडत असलेल्या पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. गेल्या आठवड्यात कमाल तापमानाने 40 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला होता.
हा आहे भारतातील सर्वात महाग ट्रॅक्टर, जाणून घ्या त्याची किंमत आणि वैशिष्ट्ये
असे असताना मात्र दोन दिवस तापमान 40 अंशांच्या खाली गेले. पुणे जिल्ह्यात गारपीट होण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवस आकाश अंशतः ढगाळ राहील. ढगांच्या गडगडाटासह हलका पाऊस आणि सोसाट्याचा वारा अपेक्षित आहे.
यामुळे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांचे यामध्ये नुकसान होत असून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
काय सांगता! गायीने दिला 'सिंहाच्या बछड्याला' जन्म, जबडा आणि पंजा पाहून सर्वच हैराण..
कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी आज मतदान, गड राखण्यासाठी अनेकांची पळापळ..
शेतकऱ्यांनो उष्माघात कसा टाळायचा, वाचा सविस्तर, अनेकांनी गमावलेत जीव
Published on: 28 April 2023, 03:06 IST