News

पश्चिमी चक्रावाताचे प्रभावामुळे तसेच वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून व नैऋत्येकडून राहण्यामुळे महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांत हवामान ढगाळ राहील. (ता. ६ ते १०) पर्यंत महाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल तर उत्तर भारताच्या वायव्य दिशेस १०१४ ते १०१६ हेप्टापास्कल इतके हवेचे दाव राहतील, वारे उत्तरेकडील भागातून बाष्प वाहून आणतील. तसेच वाऱ्याची दिशा आग्नेय व नैर्ऋत्येकडून राहणार असून, वारे त्या दिशेकडूनही बाष्प वाहून आणतील.

Updated on 06 March, 2023 11:48 AM IST

पश्चिमी चक्रावाताचे प्रभावामुळे तसेच वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून व नैऋत्येकडून राहण्यामुळे महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांत हवामान ढगाळ राहील. (ता. ६ ते १०) पर्यंत महाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल तर उत्तर भारताच्या वायव्य दिशेस १०१४ ते १०१६ हेप्टापास्कल इतके हवेचे दाव राहतील, वारे उत्तरेकडील भागातून बाष्प वाहून आणतील. तसेच वाऱ्याची दिशा आग्नेय व नैर्ऋत्येकडून राहणार असून, वारे त्या दिशेकडूनही बाष्प वाहून आणतील. अनुकूल हवामान स्थिती निर्माण होताच ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार, जालना, छत्रपती संभाजीनगर, बुलडाणा, अकोला वाशीम, अमरावती, भंडारा, नगर जिल्ह्यांत ४ ते ६ मिमी पावसाची शक्यता निर्माण होईल.

आज (ता. ६) नगर जिल्ह्यात ६ किमी पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअस तर सातारा जिल्ह्यात ३६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २० अंश सेल्सिअस राहील.

सोलापूर, पुणे, नगर जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ३१-३५ % राहील. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ५२ % राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ११-१३ % इतकी कमी राहील. वाऱ्याचा ताशी वेग पुणे व नगर जिल्ह्यात १२-१४ किमी, तर उर्वरित जिल्ह्यांत ताशी ७-१० किमी राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील.

यशवंत कारखाना सुरू होणार का? हालचाली सुरू, सभेचे आयोजन

आज (ता. ६) जालना व धाराशिव जिल्ह्यांत ५ ते ६ मिमी पावसाची शक्यता आहे कमाल तापमान धाराशिव, लातूर, बीड व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअस, तर नांदेड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत ३८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान लातूर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत २० अंश सेल्सिअस, तर धाराशिव, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस राहील.

जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत आकाश ढगाळ, तर धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३२ %, तर धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत २४-२७ % राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ६-१५ % इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने आग्नेयेकडून व नैर्ऋत्येकडून राहील.

पिंजऱ्यातील मत्स्यशेतीतून शेतकऱ्यांना मिळेल दुप्पट नफा, ही पद्धत वापरून पहा

आज (ता. ६) ठाणे व पालघर जिल्ह्यांत ४ मिमी पावसाची शक्यता असून, वाऱ्याच्या वेगातही वाढ होईल, कमाल तापमान सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअस राहील, किमान तापमान रत्नागिरी जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस, सिंधुदुर्ग जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस, रायगड जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस, तर ठाणे व पालघर जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस इतके अधिक राहणे शक्य आहे.

ठाणे व पालघर जिल्ह्यांत आकाश ढगाळ, तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ५९-६९ टक्के, तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ४२-४८ % राहील. सर्वच जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता १९-२१ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ठाणे व पालघर जिल्ह्यांत ताशी १० किमी, तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत ४-७ किमी राहील. वाऱ्याची दिशा सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात आग्नेयेकडून तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ईशान्येकडून राहील.

महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनो उत्पन्न वाढीचा आराखडा तयार करा
शेतकऱ्यांनो चारा साठवणुकीचे असे करा नियोजन
रब्बी ज्वारी

English Summary: Farmers be careful! Chance of rain in most of the districts
Published on: 06 March 2023, 11:48 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)