दि. 20 जुलै 2022 बुधवार ला पुणे येथील आय. बी. रेस्ट हाऊस ला वारकरी महामंडळाचे महाराष्ट्र अध्यक्ष श्री आर.के.सेठ( उर्फ रांजणे साहेब ),तसेच महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे महासचिव श्री फुलसुंदर महाराज,तसेच शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रमुख श्री धनंजय पाटील काकडे, व महाराष्ट्र राज्य क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे अध्यक्ष शिवाजी नाना नांदखीले, तसेच पुणे येथील श्री सतीश देशमुख साहेब व इतर कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते. सुरुवातीला श्री धनंजय पाटील काकडे व शिवाजी नाना नांदखीले यांनी शेतकऱ्यांच्या लुटीची कारणे जसे हमीभाव, उत्पादन खर्चातील तफावत, शेतकरी
विरोधी कायदे, आयात- निर्यात धोरणामुळे जागतिक व्यापारापासून शेतकऱ्यांना कसे वंचित ठेवण्यात आले, याबाबत विश्लेषण केले. फोरम ऑफ इंटलेकच्युअल्सेचे अध्यक्ष सतीश देशमुख म्हणाले Forum of Intellectuals President Satish Deshmukh said शेतकऱ्यांच्या दारिद्र्याचे कारण पूर्वजन्मीचे कर्म नसून शोषण व्यवस्था आहे.शेतकरी आत्महत्तेचा कलंक मिटविण्या साठी वारकरी संघटनेची व शेतकरी नेत्यांची या बैठकीमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली. वारकरी महामंडळाचे महाराष्ट्र अध्यक्ष श्री विठ्ठलराव रांजणे (आर. के. शेठ) हे बैठकीला संबोधित करताना म्हणाले, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणे, ही अतिशय गंभीर बाब आहे. लाखो शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना शासन दुर्लक्ष करीत आहे, ही एक सामाजिक दृष्ट्या मोठी समस्या आहे. शेतकरी
संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी, शेतीमालाच्या भावासाठी व निर्यात बंदी उठविण्यासाठी गेल्या 40 वर्षापासून शेतकऱ्यांच्या समस्येवर अतिशय प्रामाणिकपणाने लढत आहे. तसेच शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबविण्यासाठी आता वारकरी संप्रदाय संपूर्ण महाराष्ट्रातुन शेतकरी संघटनेला ताकद देऊन आर्थिक स्वातंत्र्या च्या लढाईची तयारी करणार आहे. ह. भ. प. प्रभाकर महाराज फुलसुंदर यांनी वारकरी संप्रदाय हा 75 टक्के शेतकरी असून, गेली कित्येक वर्षापासून शेतकरी सुखी होण्यासाठी पंढरपूरला पायीवारी करीत विठुरायाला साकडे घालतो . शेतकरी आत्महत्या मुळे लाखो विधवा महिलांचा प्रश्न तयार झाला असून, त्यासाठी आता सर्वांनी एकत्र
यावे अशी त्यांनी कणखर भूमिका घेतली. संपूर्ण महाराष्ट्रातील वारकऱ्यांनी पुढील शेतकरी मेळाव्यांसाठी, व आंदोलनासाठी सहकार्य करणेचे सर्वांनुमते ठरवीले. दिनांक 9 ऑगस्ट 2022 च्या क्रांती दिनी पाथरी, जिल्हा परभणी येथील होणाऱ्या शेतकरी मेळाव्यास व ऊस परिषदेला वारकरी हजर राहतील असे त्यांनी जाहीर केले. शेतकऱ्यांना न्याय व हक्कासाठी शेतकरी व वारकरी संघटनेने एकत्र येऊन, आर्थिक व सामाजिक प्रबोधनाला आता संघर्षाची जोड देणे , ही काळाची गरज आहे असे शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी फोनवर चर्चा करून सांगितले. श्री धनंजय पाटील काकडे यांनी बैठकीला उपस्थित असणाऱ्यांचे आभार मानले. व पाथरी, जिल्हा परभणी येथील शेतकरी मेळावा यशस्वी होण्यासाठी सर्वांना आवाहन केले.
धनंजय पाटील काकडे विदर्भप्रमुख शेतकरी संघटना.9890368058.
Published on: 24 July 2022, 08:23 IST