News

मुंबई. गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशात मोठ्या प्रमाणावर हवामानात मोठा बदल झाला आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. असे असताना आता हवामान खात्याने गारपिटीचा इशारा दिल्याने शेतकरी चिंतेत आहेत. उत्तरेकडील राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर थंडीची लाट आल्याने राज्यात हवामानात मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे.

Updated on 15 January, 2022 12:00 PM IST

मुंबई.  गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशात मोठ्या प्रमाणावर हवामानात मोठा बदल  झाला आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. असे असताना आता हवामान खात्याने गारपिटीचा इशारा दिल्याने शेतकरी चिंतेत आहेत. उत्तरेकडील राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर थंडीची लाट आल्याने राज्यात हवामानात मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. राज्यात  अनेक ठिकाणी पाऊस देखील झाला आहे. यामुळे येणाऱ्या काही दिवसात वातावरण असेच राहण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच राज्यात अवकाळी पाऊस झाला होता. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. यामुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडला आहे. यातच आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांपुढे हे एक मोठे संकट उभे राहिले आहे. 

राज्यात अनेक भागात धुके पडत असून याचा फटका अनेक पिकांना बसत आहे. राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान आहे. यामुळे पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे फळबागांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. यामध्ये आंबा, द्राक्ष, डाळींबाला मोठ्या प्रमाणावर फटका बसण्याची शक्यता आहे. तसेच कांदा, गहू याला देखील फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी काल हलक्या सरीचा पाऊस पडला. तसेच अमरावती आणि नागपूरमध्ये काही ठिकाणी गारपिटीचा फाटका शेतकऱ्यांना बसला. यामुळे याचा धसका शेतकऱ्यांनी घेतला आहे. 

रत्नागिरीत तब्बल दोन तास पाऊस पडल्याने आंबा पिकाला मोठ्या प्रमाणावर फटका बसला. यामुळे कैरीची गळ झाली तर अनेक ठिकाणी मोहोर गळाला आहे. पुण्यातील जुन्नर येथे देखील मोठ्या प्रमाणावर द्राक्ष पिकाला मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. विक्रीस आलेल्या द्राक्षला या पावसाचा मोठा फटका बसला. यामुळे यावर्षी देखील हातातोंडाला आलेलं पीक हातातून जाण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागासह शहरी भागात देखील पाऊस झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. अचानक आलेल्या पावसामुळे पळापळ झाली. अनेक ठिकाणी पाणी साठले होते. कमाल तापमानात घट झाल्याचे दिसून आले. यामुळे आज देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे.   

यामुळे आता शेतकरी पिकाची पाहणी  करून प्रशासनाकडे मदतीची मागणी करत आहेत. यामुळे आता यांचे पंचनामे करून तातडीची मदत रकर करणार का याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे. गेल्या नुकसान भरपाईची अजून मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही यातच आता तरी मदत मिळणार का याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. राज्य सरकारकडून विजतोडणी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी कशीबशी आपली पिके जगवली आहेत. आता या पावसामुळे शेतकरी पूर्णपणे कोलमडला आहे. यामुळे शेतकऱ्याला आर्थिक आधाराची गरज आहे. यामुळे राज्य सरकारकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

English Summary: Farmers are now in dire straits due to hail and rain, demand for help.
Published on: 10 January 2022, 06:26 IST