News

सध्या ऊस दरावरून राज्यातील अनेक भागातील शेतकरी चांगलेच आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे. आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीदेखील स्वतःच्या हक्कासाठी आंदोलनाला सुरुवात केली आहे.

Updated on 02 November, 2022 4:59 PM IST

सध्या ऊस दरावरून राज्यातील अनेक भागातील शेतकरी चांगलेच आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे. आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीदेखील स्वतःच्या हक्कासाठी आंदोलनाला सुरुवात केली आहे. या भागातील बार्शी-कुर्डवाडी रोडवर शेंद्री स्टेशन आणि रिधोरे यांच्यामध्ये ऊस दर संघर्ष समितीच्या आंदोलकांनी ऊस (sugarcane) वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे (tractor) चारही टायर फोडून आंदोलन केलं आहे. हा प्रकार शिवराय हॉटेलजवळ घडला आहे.

ऊसाला पहिला २,५०० रुपये आणि अंतिम दर ३,१०० रुपये भाव मिळावा अशी ऊस दर संघर्ष समितीने मागणी केली होती. ही मागणी करून जवळपास दहा ते पंधरा दिवस उलटले. तरीदेखील साखर कारखानदारांनी कोणतीच भूमिका जाहीर केली नाही.

याबाबत उपप्रादेशिक साखर आयुक्तालय, सोलापूर यांच्या नियोजनाखाली जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ऊस दर संघर्ष समिती आणि साखर कारखानदार यांच्यामध्ये नियोजन भवनात बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या बैठकीला बरेच कारखानदार अनुउपस्थितीत राहिले. त्यामुळे बैठकीत कोणताच तोडगा निघाला नाही.

सुरुवातीला ऊस दर संघर्ष समितीने अत्यंत शांतपणे आंदोलन केले मात्र तरीही ऊस दराबाबत कोणताच निर्णय झाला नाही. अखेर काेणताच निर्णय न घेतल्याने संतप्त शेतकऱ्यांनी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे चारही टायर फोडून निषेद व्यक्त केला. तर दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनाही ऊस दराबाबत आंदोलनाच्या तयारीत आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी सरकारने ऊस दराबाबतच्या मागण्या मान्य नाही केल्या तर 17 आणि 18 नोव्हेंबरला राज्यातील ऊस वाहतूक बंद पाडणार असा सरकारला इशारा दिला आहे.

मराठवाडा टँकरमुक्त! पाण्याचा प्रश्न मिटला, भूजल पातळीत 2 मीटरची वाढ

ऊस एफआरपीच्या मुद्यावरून राजू शेट्टी यांची सरकारवर टीका

जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत स्वस्थ बसणार नसल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी सरकारला दिला. गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाला एफआरपी पेक्षा दोनशे रुपये जास्त मिळावे. तसेच यावर्षी कारखान्यांनी एकरकमी एफआरपी द्यावी, आणि हंगाम संपल्यानंतर 350 रुपये दिले जावेत, अशा अनेक मागण्या राजू शेट्टी यांनी केल्या आहेत.

ते राहुरी तालुक्यातील टाकळीमियाँ येथील ऊस परीषदेत बोलत होते. या परिषदेच्या माध्यमातून त्यांनी सरकारकडे विविध मागण्यांची मागणी केली आहे. आणि जर सरकारने याकडे गांभिर्यानं लक्ष दिलं नाही तर मात्र 17 आणि 18 नोव्हेंबरला राज्यातील ऊस वाहतूक बंद पाडणार असा इशाराही त्यांनी दिला आहे.


महत्वाच्या बातम्या:
धडाकेबाज कारवाई! पंचनाम्यासाठी पैसे मागितल्याप्रकरणी कृषी सहायक, ग्रामसेवक निलंबित
एकाच दिवसात टोमॅटो 80 रुपयांवरुन 25 ते 30 रुपयांवर, शेतकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी..

English Summary: Farmers are aggressive over the price of sugarcane, the protestors broke all four tires of the tractor transporting sugarcane
Published on: 02 November 2022, 03:45 IST