News

शेतकऱ्यांना नेहमी नैसर्गिक संकटांना सामोरे जावे लागते जसे की कोरोनाच्या संसर्गामुळे मागील वर्षी सर्व बाजारपेठा ठप्प पडल्या त्यामुळे शेतकऱ्यांचा शेतीमाल अडकून बसला त्याची पूर्णपणे नासधूस झाली. तर आता अतिवृष्टी तसेच अनेक रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पिके ना पिके जाग्यावर नष्ट झालेली आहेत त्यामुळे शेतकरी वर्गाचे आर्थिक गणितच बिघडलेले आहे. सध्या कांद्याच्या रोपांवर मर रोग पडल्याने शेतकरी वर्ग पुन्हा एकदा संकटात दिसून आलेला असल्याचे चित्र पाहायला भेटत आहे.

Updated on 13 September, 2021 6:11 PM IST

शेतकऱ्यांना नेहमी नैसर्गिक संकटांना सामोरे जावे लागते जसे की कोरोनाच्या संसर्गामुळे मागील वर्षी सर्व बाजारपेठा ठप्प पडल्या त्यामुळे शेतकऱ्यांचा(farmer) शेतीमाल अडकून बसला त्याची पूर्णपणे नासधूस झाली. तर आता अतिवृष्टी तसेच अनेक रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पिके ना पिके जाग्यावर नष्ट झालेली आहेत त्यामुळे शेतकरी वर्गाचे आर्थिक गणितच बिघडलेले आहे. सध्या कांद्याच्या रोपांवर मर रोग पडल्याने शेतकरी वर्ग पुन्हा एकदा संकटात दिसून आलेला असल्याचे चित्र पाहायला भेटत आहे.

मागील आठवड्यापासून पावसाची सतत धार:

मागील सप्ताहात कटवन या परिसरात सावतावाडी वडणेर या गावात शेतकऱ्यांनी आपल्या शेतात लाल कांद्याची रोपे लावलेली होती मात्र त्या लाल कांद्याच्या  रोपावर  मर  रोगाचा  प्रादुर्भाव पडलेला दिसून येत आहे. सावतावाडी वडणेर या परिसरात मागील आठवड्यापासून पावसाने सतत धार चालू ठेवलेली आहे त्यामुळे कांदा पीकाच्या वाफ्यात पावसाचे पाणी साचून राहिले आहे आणि याच साचलेल्या पाण्यामुळे कांदा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव पडल्याचा अंदाज तेथील परिसरातील लोकांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा:रेशीम उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण, जालना बाजारपेठेत रेशीम कोषचे विक्रमी भाव

शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये ज्यावेळी मका तसेच बाजरी या पिकाची लागवड केली होती त्यामधील च काही क्षेत्र कांदा या पिकाची  लागवड  करण्यासाठी वाचवून  ठेवलेले  होते. यावेळी काही ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये लाल कांद्याची लागवड केली आहे तर काही ठिकाणी कांदा लागवड केलेली आहे. शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज लावत यावेळी आपल्या शेतात उशीराच कांदा बियाणे टाकले गेले. अगदी महागडी कांदा बियाणे घेऊन आपल्या शेतामध्ये टाकले मात्र आत्ता त्या रोपांवर मर रोगाचा प्रादुर्भाव पडलेला दिसून येत आहे.सध्या रोगाचा प्रादुर्भाव तर पडलेला आहे आणि शेतकऱ्यांनी महाग बियाणे तर खरेदी केलेले आहे त्यामुळे कुठेतरी शेतकरी वर्गाचे आर्थिक गणित बिघणार आहे.

ज्यावेळी पावसाने सतत बरसने चालू केले होते त्यानंतर काही ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली. मात्र पुन्हा  एकदा मागील  आठवड्यात पाऊसाने सतत  धार  लावली  असल्याने  यावेळी  ही पावसाची धार कांद्याच्या रोपाला घातक ठरणार आहे.या सततच्या रिमझिम पावसाने यावेळी कांद्याची रोपे चांगली राहणार नसल्याने जी महागडी बियाणे शेतकरी वर्गाने घेतली होती  ती वाया जाण्याची शक्यता वर्तवली गेलेली आहे.रिमझिम पावसामुळे कांद्याच्या  वाफ्यात पाणी  साचून  राहिल्यामुळे वाफे  खराब झालेले आहेत त्यामुळे ज्या कांदा उत्पादकांनी लाल कांद्याची लागवड केलेली आहे ती फेल जाणार असल्याची शक्यता तज्ञांनी निर्माण केली आहे.

English Summary: Farmers are again in trouble due to the outbreak of deadly disease on onion seedlings
Published on: 13 September 2021, 06:11 IST