News

कोणतेही आस्थापन हे त्याच्या यशासाठी कायम मेहनत करत राहणार्‍या कर्मचारी वर्गाशिवाय यशस्वी होऊ शकत नाही.

Updated on 15 March, 2022 10:37 AM IST

कोणतेही आस्थापन हे त्याच्या यशासाठी कायम मेहनत करत राहणार्‍या कर्मचारी वर्गाशिवाय यशस्वी होऊ शकत नाही. मागील आठवड्यामध्ये FarmERP (फार्मइआरपीने) महिला दिन केवळ जोमाने साजराच केला नाही तर तो आपल्या महत्त्वाचा भाग म्हणजेच कर्मचार्‍यांसोबत साजरा केला.

FarmERP (फार्मइआरपी) ने 3 मार्च 2022 पासून समारंभांची एक शृंखला सुरू ठेवली ज्यामध्ये सांघिक प्रवृत्तीला बढावा देण्यासाठी क्रिकेटची स्पर्धा होती, त्यानंतर ब्रॅंडने रक्षता आयुर्वेद आणि पंचकर्म संस्थेच्या संस्थापिका डॉ. लीना बोरूडे यांच्याद्वारे आरोग्याबद्दल खबरदारी बाळगण्याशी संबंधित सत्र आयोजित करत महिला दिन साजरा केला.

9 मार्च 2022 रोजी FarmERP (फार्मइआरपी) ने कार्यालयातील ओळींची सजावट करून भविष्यातील पर्यावरण संबंधित आव्हानांकडे लक्ष वेधणार्‍या एका समारंभाचे आयोजन केले. FarmERP (फार्मइआरपी) कडून संपूर्ण आठवडा हा आपल्या कुटुंब असलेल्या कर्मचार्‍यांसाठी वेगवेगळे समारंभ ठेवण्यात आल्यामुळे ते एव्हढ्यावरच थांबलेले नव्हते. 

ब्रॅंडने आपल्या कर्मचार्‍यांसाठी एक बुद्धिबळ सामना देखील आयोजित केला ज्यानंतर लव्ह केअर शेअर फाउंडेशनच्या साथीने गौरवशाली उपक्रमातून बांधकाम कामगारांच्या मुलांना शैक्षणिक साहित्याचा वाटप केला ज्याचे लक्ष्य शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट करण्याचे होते आणि त्यानंतरच्या दिवशी ग्रअ‍ॅंड शेरेटन पुणे येथे मोठा कॉर्पोरेट समारंभ ठेवण्यात आला.

“वर्षभर आपण सगळेच FarmERP (फार्मइआरपी) मध्ये धावपळ आणि समर्पण वृत्ती पाहत असतो आणि ज्यांनी आजवर आपल्याला समर्थन दिले आहे आणि आजही देत आहेत त्यांच्या मेहनतीची कदर करण्याची ही आमची पद्धत आहे. हे आयोजित करताना केवळ मजाच आली असे नाही तर हे सगळे आमचे सदस्य त्याचबरोबर आमच्यासाठी देखील संस्मरणीय बनवायचे होते. येत्या काळामध्ये आपण असे अनेक मैलाचे दगड सर केलेले देखील एकत्र पाहू शकू.”

- संजय बोरकर, सह-संस्थापक, शिवराई टेक्नॉलॉजीज आणि फार्म इआरपी

या सगळ्यात आणखी आनंदाची बाब म्हणजे, शिवराई टेक्नॉलॉजीज यावर्षी त्यांचा 26वा वर्धापनदिन साजरा करत आहे ज्यामुळे त्यांनी त्यांच्या लाडक्या व्यक्तींसोबत हा वर्धापनदिन साजरा करण्याचे मोठे निमित्तही होते.

26 वर्षांपूर्वी, पुण्यातील शेती करणार्‍या कुटुंबांतून आलेल्या कॉंप्युटर इंजिनीअर्सनी एकत्र येऊन नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेती आणि शेतीशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी शिवराई टेक्नॉलॉजीजची स्थापना केली. या दोघांनी मिळून शिवराई टेक्नॉलॉजीज हा शेती संबंधित समस्यांशी संबंधित एक मंच सुरू केला.

आज याच मंचाचे सॉफ्टवेअर जगभरातील 30 देशांमध्ये उपलब्ध झाले आहे, ब्रॅंडचा विकास हा कौतुकास्पद आहे आणि आज ते एक सर्वाधिक अनुभवी आणि विश्वसनीय शेती व्यवस्थापन सॉफ्टवेअर म्हणून बाजारामध्ये उपलब्ध असलेले प्लॅटफॉर्म सॉफ्टवेअर आहे. बी2बी ग्राहकवर्ग असेल किंवा बी2सी ग्राहक असतील, मध्यम आकारातील कॉर्पोरेट असतील किंवा मोठे कॉर्पोरेट असतील, FarmERP (फार्मइआरपी)ने गेल्या काही वर्षांमध्ये आस्थापनांना नवीन, कल्पक, आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त आणि स्मार्ट उपाय मिळवून दिले आहेत ज्यातून शेतीशी संबंधित समस्या सोडवता येऊ शकतील. आज हा एक जगभर विश्वासार्ह ठरलेला एक प्लॅटफॉर्म ठरला आहे जो जगातील 30 पेक्षा अधिक देशांमध्ये शेतकी कार्यासाठी आणि संपूर्ण शेतकी पार्श्वभूमी असलेल्या उद्योगांना उपयोगी पडेल असे परिवर्तनशील उपाय देणारा मंच ठरतो आहे.

“संजय आणि मी शिवराई टेक्नॉलॉजीज सुरू करण्याचे लक्ष्य म्हणजे, सर्व बंधने झुगारून शेतकर्‍यांना रोजच्या रोज सामोरे जावे लागणार्‍या समस्यांचे उपाय शोधणे हे होते. मागील 27 वर्षांमध्ये शिवराई टेक्नॉलॉजीजने नियमित प्रामाणिक मेहनत करून जगातील शेतकी इआरपी क्षेत्रामधील आघाडीची कंपनी म्हणून नाव कमावले आहे. आज आपला सेवा पुरवठा करण्याचा आवाका 30 देशांमध्ये पसरला आहे आणि भविष्यात तो आणखी वाढवण्याचे आपले लक्ष्य आहे. आघाडीची कंपनी म्हणून आमचा असा दृढ विश्वास आहे की आपण देत असलेल्या सेवेतून शेतकी क्षेत्रामध्ये फार मोठा सकारात्मक आणि सक्षम बदल घडून येईल.”

- संतोष शिंदे, शिवराई टेक्नॉलॉजीज आणि FarmERP (फार्मइआरपी) चे सहसंस्थापक

FarmERP (फार्मइआरपी) सह, आस्थापनांच्या कार्यप्रदर्शनामध्ये सुधारणा, खर्चामध्ये घट, अचूक उत्पादन अंदाज, उत्तम कार्यात्मक निर्णय, परिणामकारक संसाधन व्यवस्थापन, नियंत्रित आर्थिक हिशेब आणि अहवाल निर्मिती झाल्याचे आढळून आले आहे.

FarmERP (फार्मइआरपी) च्या आस्थापनेतील अद्वितीय एकत्रीकरण हे त्यांना संसाधन, शेतजमिनी आणि मजुरांच्या व्यवस्थापनाचा व्यवस्थित आणि परिनामकारक मार्ग प्रदान करते. आणि आज फार्मग्यानच्या तोंडओळखीमुळे बहुतांशी लोकांना विविध देशांतील शेतकी क्षेत्रातील क्लिष्टतांबद्दल समजून घेण्यात आणि त्यावर प्रभुत्व मिळवण्यास मदत होईल.

आज FarmERP (फार्मइआरपी)च्या सहसंस्थापकांचे लक्ष्य फार्मइआरपीचे येत्या वर्षांमध्ये प्रत्येक बाजारपेठांमध्ये अस्तित्त्व असणे आणि शेतकी क्षेत्रातील सहभागींना आणि शेतकर्‍यांना उद्भवणार्‍या प्रत्येक समस्येचे यशस्वीरीत्या निराकरण करणे हे आहे जेणेकरून ते यशस्वी आणि लाभदायी पिकाचा आनंद घेऊ शकतील आणि त्यामुळे उत्तम अन्नसाखळी देखील घडवू शकतील.

English Summary: FarmERP (Farm ERP) celebrated this year's anniversary with its employees.
Published on: 15 March 2022, 10:35 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)