शेतकऱ्यांसोबत महिला फक्त आता शेतीमध्येच कष्ट करत नाहीत तर आधुनिक युगात आपली मजल ठेवून अमुलाग्र बदल घडवत आहेत. मागील दोन दिवसांपूर्वी च राज्य सरकारने चालू चे वर्ष महिला आघाडी असल्याचे स्पष्ट केले आहे. महिला गटशेती ची सुरुवात तुळजापूर तालुक्यातील मसला खुर्द गावातून सुरू झाली. गावातील महिला वर्गाला गटशेती चे महत्व समजले आहे जे की त्यांनी त्यांच्या गटाच्या माध्यमातून ऍग्रो प्रोड्युसर कंपनीची स्थापना सुद्दा केली आहे. त्यांनी या कंपनीच्या माध्यमातून हजारो महिलांना काम दिले आहे. यामध्ये सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले पिकांचे उत्पादन काढीत ते आता मेट्रो सिटी मध्ये विकले जाते आहे.
अशी झाली शेतीची सुरवात:-
तुळजापूर तालुक्यातील मसला गावातील महिलांनी सुरुवातीस २० गुंठे जमीन भाड्याने घेतली होती. त्या शेतीमध्ये नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे जे की शेतीसोबत पशुपालन, कुक्कुटपालन, बीज बँक या सर्व गोष्टींची उभारणी करून गटशेती करण्यास सुरू केले. शैलजा नरलवडे या महिलेने पुढाकार घेत मसला गावात अॅग्रो प्रोड्युसर या कंपनीची स्थापना केली आहे. गतशेतीच्या माध्यमातून महिलांनी मोठा बदल घडवून आणलेला आहे.
बीज बॅंकेच्या माध्यमातून बियाणांचा पुरवठा:-
मागील वर्षात गतशेतीच्या माध्यमातून महिलांनी शेतात खूप वेगवेगळे प्रयोग केले आहेत. सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला भाजीपाला चे उत्पादन घेत त्यांनी आता पर्यंत ४० प्रकारचे नवीन वाणाच्या बियाणे सुद्धा तयार केले आहेत. त्यांनी त्याचे किट सुद्धा तयार करून विक्रीसाठी उपलब्ध केले आहे. बियानाच्या १५ - २० ग्रॅम च्या किट ची किमंत २५० रुपये आहे. ही विक्री फक्त उस्मानाबाद जिल्ह्यात न्हवे तर संपूर्ण महाराष्ट्रात केली जाते.
महिलाच आता कारभारी:-
जेव्हा महिलांनी गटशेती सुरू केली तेव्हा त्यांना कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार न्हवता मात्र आता पुरुष मंडळीने स्वतः महिलांच्या नावावर जमीन केली आहे. हा एक मोठा बदल असून शेतीची ८० टक्के कामे महिलाच बघत आहेत. गटशेती करून आता स्वतः महिलाच कारभारी झालेल्या आहेत.
Published on: 24 December 2021, 09:18 IST