News

आपला भारत देश शेतीप्रधान देश आहे. देशात फार पूर्वीपासून शेती केली जात आहे. काळाच्या ओघात आता शेतीमध्ये मोठा बदल देखील बघायला मिळत आहे. पूर्वी पारंपारिक पद्धतीने भारतात शेती केली जात होती. मात्र आता यांत्रिकीकरणाला चालना मिळत असल्याने शेती व्यवसायात यंत्राचा मोठा वापर होऊ लागला आहे.

Updated on 07 June, 2022 12:36 PM IST

आपला भारत देश शेतीप्रधान देश आहे. देशात फार पूर्वीपासून शेती केली जात आहे. काळाच्या ओघात आता शेतीमध्ये मोठा बदल देखील बघायला मिळत आहे. पूर्वी पारंपारिक पद्धतीने भारतात शेती केली जात होती. मात्र आता यांत्रिकीकरणाला चालना मिळत असल्याने शेती व्यवसायात यंत्राचा मोठा वापर होऊ लागला आहे.

आता ट्रॅक्टर पासून ते ड्रोनपर्यंत अत्याधिक अत्याधुनिक यंत्रांचा वापर शेतीमध्ये बघायला मिळत आहे. ड्रोनचा शेतीमध्ये वापर वाढल्यास शेतकर्‍यांच्या उत्पन्नात भरीव वाढ होणार असल्याचा दावा केला जातो. आतापर्यंत शेतकरी बांधवांना विविध संस्थांच्या माध्यमातून ड्रोन खरेदी करता येणे शक्य होणार होते.

मात्र, आता केंद्र सरकारने ड्रोनचा वापर वाढवण्यासाठी व शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ घडवून आणण्यासाठी आता थेट शेतकऱ्यांना ड्रोन खरेदी करता यावे म्हणून अनुदानावर शेतकरी बांधवांना ड्रोन उपलब्ध करून देण्याची योजना आखली आहे. आता शेतकरी बांधवांना अनुदानावर ड्रोन खरेदी करता येणार आहे.

मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, केंद्रीय कृषी कल्याण व यांत्रिकिकरण विभागाने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे संस्थांची मध्यस्ती बाजूला होणार असून आता अनुदानाचा लाभ थेट शेतकऱ्यांनाच मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार असल्याचे कृषी क्षेत्रातील जाणकार लोक मत व्यक्त करत आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे देशातील करोडो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. एवढेच नाही तर शेतकऱ्यांना ड्रोन शेती संदर्भात जागरूक देखील केले जाणार आहे.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, केंद्र सरकार शेतकरी उत्पादक संघटनाना 75 टक्के अनुदानावर ड्रोन उपलब्ध करून देणार आहे. तसेच कृषी विद्यापीठे व आयसीएआर केंद्रांना 100 टक्के अनुदान सरकार देणार आहे. जे की शासनाच्या या निर्णयानंतर देखील कायम राहणार आहे. मात्र आता शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना थेट अनुदानावर ड्रोन खरेदी करता येणार आहे. मित्रांनो सध्या मार्केटमध्ये 2 लाख 50 हजार पासून ते 10 लाखापर्यंतचे ड्रोन उपलब्ध आहेत. आज आपण शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी कशा पद्धतीने अनुदान दिले जाणार आहे व त्यासाठी काय निकष शासनाने घालून दिले आहेत याविषयी जाणून घेणार आहोत.

ड्रोन खरेदीसाठी आवश्यक पात्रता व नियम

»शेतकऱ्यांना थेट अनुदानावर ड्रोन शासनाद्वारे उपलब्ध करून दिला जाणार आहे. मात्र, शेतकऱ्यांना शासनाने ठरवून दिलेल्या कंपनीचाच ड्रोन खरेदी करावा लागणार आहे. शासनाच्या नागरी हवाई उड्डाण विभागाच्या माध्यमातून मंजुरी मिळालेल्या कंपनीचाचं ड्रोन शेतकऱ्यांना अनुदानावर उपलब्ध होणार आहे.

»याशिवाय ड्रोन खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना शासनाच्या वेब पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक राहणार आहे. शासनाच्या डिजिटल स्काय पोर्टल या वेबसाईट वर शेतकऱ्यांना नोंदणी करावी लागणार आहे.

»जो ड्रोन शेतकऱ्यांना खरेदी करायचा आहे त्या मध्ये अपघात नियंत्रक, चढ-उतार क्षमता, जेथून उडविले तेथेच परत येण्याची यंत्रणा आणि त्यामध्ये छायाचित्रही काढता येणे गरजेचे आहे. या फिचर्सच्या ड्रोनवरच शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे.

»ड्रोनची कंपनी ही भारतामधलीच पाहिजे शिवाय त्यामध्ये सोई-सुविधा असणे गरजेचे आहे. शिवाय भारतीय गुणवत्ता प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.

»ज्या राज्यातील शेतकऱ्याने ड्रोन खरेदी केले आहे तिथेच त्याला प्रशिक्षण आणि देखभाल दुरुस्तीचे काम करता येणे गरजेचे आहे.

किती अनुदान मिळणार?

»मित्रांनो ड्रोन महागडे असल्याने ते शेतकऱ्यांना खरेदी करुन त्याचा शेतीव्यवसायात वापर करणे आर्थिक दृष्ट्या अशक्‍य आहे. यामुळे मायबाप शासनाने या गोष्टीची दखल घेतली आहे आणि आता अनुदानावर ड्रोन उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. मित्रांनो आता अल्प किंवा अत्यल्प भूधारक शेतकरी तसेच अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील शेतकरी बांधवांना 5 लाखापर्यंतचे अनुदान ड्रोन खरेदीसाठी दिले जाणार आहे.

»याशिवाय शेतकरी उत्पादक कंपनी तसेच इतर प्रवर्गातील शेतकऱ्यांना 4 लाखापर्यंतचे अनुदान ड्रोन खरेदी करण्यासाठी मिळणार आहे. तर केव्हीके, कृषी विद्यापीठे, कृषी यंत्रे व अवजारे तपासणी यासारख्या संस्थांना 10 लाखापर्यंतचे अनुदान असणार आहे.

English Summary: Farmer will get 5 lakh subsidy for drone
Published on: 07 June 2022, 12:36 IST