महाराष्ट्र राज्य हे शेतीपूरक व्यवसाय मध्ये पुढे असले तरी आधुनिक शेतीमध्ये शेतकऱ्यांची उज्वल भविष्य दडले आहे.
अवकाळी पावसामुळे शेतकरी मेटाकुटीला येतो. त्यामुळे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत सेंद्रिय शेतीची कास धरावी, असे आवाहन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले.
राज्यपाल कोश्यारी यांनी रविवारी घोटी येथील सॉईल बेस्डहायटेक व्हर्टिकल फार्मिंग असलेल्या ए.एस. ऍग्री अँड एक्वा एल. एल.पी कंपनीस भेट दिली.
या भेटीदरम्यान त्यांनी शंभर एकर हळदीची शेती एका एकरात कसे शक्य आहे याची तांत्रिक बाजू समजून घेतली. पॉलिहाऊसमध्ये उत्पादित करण्यात आलेल्या हळद, तांदूळ, केळी, फळ भाज्या, मत्स्यपालनाचा विविध प्रकल्पांची त्यांनी पाहणी केली. उत्तराखंड मध्ये ही शेकडो एकर मध्ये आधुनिक शेती कशा प्रकारे करता येईल, यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अप्पर पोलीस अधीक्षका माधुरी कांगणे,जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर, प्रांताधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार परमेश्वर कासुळे, राज्यपाल प्रबंधक राकेश नातानी आदी मान्यवर उपस्थित होते.
Published on: 31 January 2022, 11:06 IST