News

शेतकरी त्याच्या शेतावर पिकांवर आणि पाळीव प्राण्यावर जीवापाड प्रेम करतो. असे असताना आता याचाच प्रत्यय आला आहे. नांदेड जिल्ह्यात वासराचे धुमधडाक्यात बारसं घालण्यात आले आहे. याची सध्या चांगली चर्चा रंगली आहे. याठिकाणी एक गाय अत्यंत बेजार झाली होती.

Updated on 16 March, 2022 10:49 AM IST

शेतकरी त्याच्या शेतावर पिकांवर आणि पाळीव प्राण्यावर जीवापाड प्रेम करतो. असे असताना आता याचाच प्रत्यय आला आहे. नांदेड जिल्ह्यात वासराचे धुमधडाक्यात बारसं घालण्यात आले आहे. याची सध्या चांगली चर्चा रंगली आहे. याठिकाणी एक गाय अत्यंत बेजार झाली होती. अशक्तपणाने कोलमडली होती. मरणाला टेकलेल्या या गाईकडे एका संवेदनशील शेतकऱ्याची (Farmer) नजर पडली, त्याने गाईला आपल्या खांद्यावर उचलले आणि थेट घरी आणले. तसेच तिला औषध दवाखाना देखील केला.

या शेतकऱ्याने या गाईची काळजी घेतल्याने ही गाई यामधून बरी झाली. शेतकऱ्यानं केलेल्या संगोपनानंतर गाईला नवा जन्मच दिला होता. आता याच गाईच्या पोटी एक वासरु जन्माला आले आहे. यामुळे या शेतकऱ्याला अजूनच आनंद झाला. घरात एकही मुलगी नाही. त्यामुळे या वासराला मुलगी मानत शेतकऱ्यांने धुमधडाक्यात बारसं केलं आहे. यामुळे या शेतकऱ्याची सध्या राज्यात चर्चा रंगली आहे.

मारुती मारजवाडे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. नांदेड जिल्ह्यात खानापूर हे त्यांचे गाव आहे. यानिमित्त त्यांनी वासराला पाळण्यात बसवून फोटोसेशल पार पडले. गावातील महिलांनीही मोठ्या उत्साहात पाळणे म्हणत वासराचे नाव देखील ठेवले आहे. तसेच यावेळी गावातील सर्वांना जेवणासाठी देखील बोलवण्यात आले होते. यामुळे हा एक चर्चेचा विषय ठरत आहे.

अख्खा गाव या वासराच्या बारशासाठी एकत्र आला होता. मारुती मारजवाडे यांना मुलगी नाही. या वासराच्या रुपात आपल्याला मुलगी जन्माला आली आहे. दोन वर्षांपूर्वी मारुते हे शेतात गेले होते. तेव्हा त्यांना एक गाय मरणासन्न अवस्थेत सापडली होती. या शेतकऱ्यानं गाईला आपल्या खांद्यावर घेतले आणि ते घरी आले. घरी जाऊन शेतकऱ्यानं या गाईला धडधाकट केले. त्यानंतर आता या गाईने एक वासरु जन्माला घातल. यामुळे ते खूपच खुश झालवे होते.

महत्वाच्या बातम्या; 
शेतकऱ्यांना दिलासा! आता दूध व्यवसाय परवडेल, दुधाच्या दरात सरसकट लिटरमागे 3 रुपयांची वाढ
होळीच्या दिवशी शेतकऱ्यांना कर्जमाफीची खास भेट, 34,788 शेतकऱ्यांना होणार लाभ
“शेतकऱ्यांच्या जमिनीवर धरणे बांधून वीजनिर्मीती केली पण त्याच शेतकऱ्यांना आज वीज मिळत नाही”

 

English Summary: Farmer throws calf in a hurry! The whole village gathered at the bar ..
Published on: 16 March 2022, 10:49 IST