महावितरणने सध्या कृषीपंप थकबाकीदार शेतकर्यांचे वीज कनेक्शन कापण्याचा धडाका लावलेला आहे.महावितरण कंपनी ही शेतकरी व राज्य सरकार या दोघांची लुट करत असून या लुटीमुळे राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी त्यांच्या शेती पंपाची अखेरची वीजबिले व थकबाकी दुरुस्ती साठी तक्रार अर्ज दाखल करावेत.
नंतर महावितरणाच्या सवलत योजनेचा लाभ घ्यावा. अनेक खाणी तक्रारी प्राप्त झाल्या आहेत की महावितरणचे अधिकारी शेतकऱ्यांच्या तक्रारी दाखल करून घेत नाहीत. अधिकारी शेतकऱ्यांच्या अशा आशयाच्या तक्रारी दाखल करून घेण्यास टाळाटाळ करत असतील तर ग्राहक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. असे आव्हान वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष व वीज तज्ञ प्रताप होगाडे यांनी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केले.
शासनाने शेतकऱ्यांना वीज बिल भरल्यास त्यामध्ये 50 टक्के सवलत देण्याची योजना आणली आहे आणि याची अंतिम मुदत मार्च 2022 पर्यंत आहे. परंतु शेतीपंपाची बिले चुकीच्या पद्धतीने दिली गेले असल्याने अगोदर दुरुस्त करणे आवश्यक असून त्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज दाखल करावेत. यासंबंधी जनजागृती व्हावी म्हणून विज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे, महाराष्ट्र चेंबर वीज समितीचे मुकुंद माळी राज्यभर दौरा करत आहेत.
अशा पद्धतीने शेतीपंपांची होती वीज बिल आकारणी….
राज्यातील सर्व विना मीटर शेती पंपाच्या अश्वशक्ती 2011-12 पासून वाढवण्यात आलेली आहे.
त्यामुळे बिलिंग तीन ऐवजी पाच, पाच ऐवजी साडेसात व साडेसात ऐवजी दहा अश्वशक्ती याप्रमाणे सुरू आहे. ज्या शेती पंपांना मीटर आहे अशा मीटर असलेल्या शेती पंप पैकी 80 टक्के पंपाचे मीटर बंद आहेत. राज्यातील 1.4 टक्के शेतीपंपाचे मीटर रीडिंग प्रमाणे बिलिंग होत आहे. उर्वरित 98.6 शेतीपंपांची बिलिंग गेल्या दहा वर्षापासून दरमहा सरासरी प्रति अश्वशक्ती 100 ते 125 युनिट याप्रमाणे केली जात आहे. क्या कर रहा देणारे बिलिंग किमान दुप्पट वा अधिक आहेत.त्यामुळे बिले, वीज वापर व थकबाकी प्रचंड प्रमाणात वाढली आहे.(संदर्भ-दिव्यमराठी)
Published on: 10 January 2022, 09:31 IST