दिवसेंदिवस शेतीमध्ये विविध प्रकारच्या नैसर्गिक संकटाने ग्रस्त असलेल्या शेतकऱ्याचे जीवन खरच किती कठीण झाले आहे हे सगळ्यांना माहिती आहे. मोठ्या कष्टाने पिकवलेल्या शेतमाल विकायला जेव्हा शेतकरी बाजारपेठेत जातो
परंतु त्याठिकाणीही बऱ्याचदा कवडीमोल दराने माल विकला जातो. अशामुळे बरेच शेतकरी नैराश्यग्रस्त झाले आहेत. या सगळ्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर एक बातमी समोर येत आहे ती म्हणजे, एका शेतकऱ्याने बँक अधिकाऱ्यांकडे केलेले अजब मागणीची.
काय आहे नेमके प्रकरण?
याबाबतची सविस्तर माहिती अशी की परभणी जिल्ह्यातील बोरी या गावचे शेतकरी दगडोबा देवराव वजीर यांची गावातच दोन एकर शेती आहे.
परंतु त्यांनी बँकेला कर्ज मागण्यासाठी पत्र लिहिले असूनया पत्रात नमूद केले आहे की,माझी दोन एकर शेती असून मी कित्येक वर्षापासून शेती करत आहे.
निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीमधून अपेक्षित उत्पादन मिळत नाही.त्यासोबतच सुलतानी संकटात उत्पादन हाती पडत नाही.
काबाडकष्ट करून देखील शेतकरी नेहमीच अडचणींचा सामना करून पुढील हंगामासाठी आशावादी असतात. परंतु तरीदेखील आसमानी व सुलतानी संकटाचे दुष्टचक्र संपत नाही.
त्यामुळे शेतीला पर्याय म्हणून दुसरा व्यवसाय सुरू करण्यासाठी मला हेलिकॉप्टर खरेदीसाठी बँकेकडून कर्जाची आवश्यकता आहे. त्यासाठी मला शाखेकडून सहा कोटी 67 लाख रुपये कर्जाची आवश्यकता असून हेलिकॉप्टर व्यवसाय तासाला 65 हजार रुपये भाडे मिळतेत्यामुळे हा विचार केला आहे.
असे त्यांनी बँकेला लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.यासंबंधीचे वृत्त न्यूज 18ने दिले आहे. याबाबत बोलताना ते म्हणतात की, 1972 साली माझे वडील वारल्यानंतर मी नऊ वर्षाचा होतो तेव्हापासून शेती करत आहे.
मागच्या पन्नास वर्षात मी अल्पभूधारक असून देखील कष्ट करून चांगल्या पद्धतीने शेती करून विक्री उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला.
परंतु सरकारच्या धोरणामुळे शेती परवडत नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना ते म्हणतात ते 1972 ते 2019 या काळात मी शेतीच्या माध्यमातून सरकारला 6 कोटी 67 लाखांच्या आसपास धान्य उपलब्ध करून दिल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
परंतु आता सरकारची धोरणे तसेच बी बियाणे आणि खतांची वाढते भाव यामुळे शेतकऱ्यांना शेती परवडत नाही. पत्र
त्यामुळे निव्वळ शेतीवर उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. शेती गहाण ठेवून देखील पीककर्ज मिळत नसून त्यासाठी बॅंकांचे उंबरठे झिजवावे लागतात.
दोन एकर शेती विकून देखील हेलिकॉप्टर खरेदी करता येत नाही म्हणून मी मागच्या पन्नास वर्षात सरकारला धान्याच्या रूपात केलेल्या मदतीचे तारण ठेवून मला भाड्याने हेलिकॉप्टर द्यावे त्यासाठी मी भारतीय स्टेट बँकेत अधिकार्यांकडे निवेदन दिले आहे.
मोठे उद्योगपती हेलिकॉप्टर भाड्याने घेऊन चांगले उत्पन्न मिळवता त्यामुळे हेलिकॉप्टर भाड्याने देण्याचा व्यवसाय निवडला असून त्यासाठी बँकेकडे करण्याची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.
नक्की वाचा:गोपीचंद पडळकरांना मंत्री करा!! कार्यकर्त्याने फडणवीसांना रक्ताने लिहिले
Published on: 07 July 2022, 01:43 IST