News

यावर्षी सगळीकडे जास्तीचा पाऊस झाल्याने सगळ्यात शेती पिकांचे नुकसान झाले. कापूस, सोयाबीन आणि कांदा या पिकांचे अतोनात नुकसान झाले.तसेच मागे आलेल्या अवकाळी मुळे रब्बी हंगामासाठी टाकलेल्या रोपवाटिका देखील रोगांचा प्रादुर्भाव होऊन खराब झाल्या.

Updated on 12 December, 2021 7:26 AM IST

 यावर्षी सगळीकडे जास्तीचा पाऊस झाल्याने सगळ्यात शेती पिकांचे नुकसान झाले. कापूस, सोयाबीन आणि कांदा या पिकांचे अतोनात नुकसान झाले.तसेच मागे आलेल्या अवकाळी मुळे रब्बी हंगामासाठी  टाकलेल्या रोपवाटिका देखील रोगांचा प्रादुर्भाव होऊन खराब झाल्या.

जर आपण कांदा पिकांचा विचार केला तर हे नगदी पीक म्हणून मोठ्या प्रमाणात लावली जाते. परंतु मागील वर्षांपासून पाऊस व इतर कारणांमुळे कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. खरीप हंगामात लागवड केलेला कांदा  मोठ्या कष्टाने जतन केला परंतुतो चांगला पोसलाच न गेल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. या परिस्थितीमध्ये दोन एकर कांद्याच्या शेतात शेतकऱ्याने अक्षरशा जनावरे सोडून दिले आहेत.

याबाबतची अधिक माहिती अशी की, बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील कऱ्हेवडगाव येथील एका शेतकऱ्याने त्यांनी लावलेल्या दोन एकर शेतात कांदा लागवड केली होती.हा कांदा चार महिने जोपासण्यासाठी भरपूर खर्च आला. मात्र हा कांदा पोसलाच न गेल्याने त्याची काढणी कापणीयामध्ये अधिक खर्च न करता शेतकऱ्यांनी आपल्या शेतात जनावरे चरायला सोडून दिली.

 खर्च केला 90 हजार  उत्पन्न मिळाले 920 रुपये

 सततचे ढगाळ वातावरण आणि पावसामुळे यंदाच्या खरिपातील कांदा पिक ही चांगली पोसले गेले नाही. दोन एकरातील कांदा जोपासण्यासाठी चार महिने 20 दिवस लागले. त्यासाठी भरपूर मेहनत घेतली असेल 90 हजार रुपये खर्च करावे लागले. हंगामाच्या पहिल्या टप्प्यात केवळ 30 किलो कांदा विक्री योग्य होता. त्यातून त्यांना 920 रुपये मिळाले होते. त्यानंतर कांदा पीक काढण्याची अवस्थेतच नसल्याने यामध्ये शेतकऱ्याने जनावर सोडली.

English Summary: farmer releave animal for grazing in onion crop in beed district
Published on: 12 December 2021, 07:26 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)