News

केंद्राने केलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात मागील सात महिन्यांपासून रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांनी आता केंद्र सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेतली असून या आंदोलन करता शेतकऱ्यांनी शनिवारी भारतभर शेती बचाव लोकशाही बचाव दिन साजरा केला. या आंदोलना दरम्यान त्यांनी हरियाणाच्या पंचकुलात बॅरिकेड्स तोडून राजभवना कडे धाव घेतली.

Updated on 27 June, 2021 1:13 PM IST

 केंद्राने केलेल्या तीन  कृषी कायद्याविरोधात मागील सात महिन्यांपासून रस्त्यावर  उतरलेल्या शेतकऱ्यांनी आता केंद्र सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेतली असून या आंदोलन करता शेतकऱ्यांनी शनिवारी भारतभर शेती बचाव लोकशाही बचाव दिन साजरा केला. या आंदोलना दरम्यान त्यांनी हरियाणाच्या पंचकुलात बॅरिकेड्स तोडून राजभवना कडे धाव घेतली.

 या घटनेमुळे दिल्लीच्या सीमावर्ती भागातील सुरक्षा वाढविण्यात  आली आहे. या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलनाला जवळजवळ सात महिने पूर्ण झाले, पण तरीही सरकारने कोणताही तोडगा काढला नाही. परिणामी आत्तापर्यंत संयमी भूमिका घेणाऱ्या शेतकऱ्यांनी शनिवारी आक्रमक होत पंचकूला तील बॅरिकेड्स तोडून  पंजाब हरियाणा चा राज भवन कडे धाव घेतली.

 याला अटकाव करण्यासाठी पोलिसांनी थंड पाण्याचा फवाऱ्यांचा मारा आंदोलनकर्त्यांवर केला परंतु ते मागे हटले नाहीत. राज्यपालांना कृषी कायदा रद्द करण्याचे निवेदन सोपविल्या शिवाय  मागे हटणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला तसेच हे आंदोलन शांततापूर्ण असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला.. शनिवारी संपूर्ण देशात शेतकर्‍यांनी शेती बचाओ, लोकशाही  बचाओ दिन साजरा केला कारण शनिवारी शेतकरी आंदोलनाला सात महिने व आणीबाणीला 46 वर्ष पूर्ण झाले. या आंदोलनांतर्गत हजारो शेतकऱ्यांनी आप आपल्या राज्यातील राजभवनावर मोर्चे काढले अशी माहिती संयुक्त किसान मोर्चा ने एका निवेदनाद्वारे दिली.

तसेच दिल्लीच्या टी करी व गाजीपुर सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी याप्रकरणी संसदेवर चाल करण्याचा इशारा दिला आहे. म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून दिल्ली पोलिसांनी राष्ट्रीय राजधानीच्या सर्व सीमांवर सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. या दरम्यान केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर त्यांनी शनिवारी परत एकदा शेतकऱ्यांना आपले आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले आहे.. केंद्र सरकार कायद्यातील तरतुदीवर चर्चा करण्यास तयार असून त्याचे निराकरण करण्यास तयार आहे असे ते म्हणाले.

English Summary: farmer protest
Published on: 27 June 2021, 01:13 IST