'शासन आपल्या दारी' या अभियानाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ
१. शासनाच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य शासनातर्फे सुरू करण्यात आलेल्या शासन आपल्या दारी या अभियानाचा काल शुभारंभ पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील दौलतनगर येथे हा शुभारंभ पार पडला. नागरिकांना मोठ्या प्रमाणात योजनांचा लाभ देण्यासाठी हे अभियान अधिक व्यापक करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
तसेच शेतकऱ्यांना संकटकाळात दिलासा देण्यासाठी एनडीआरएफच्या निकषापेक्षा दुप्पट मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. 'नमो शेतकरी' योजनेच्या माध्यमातून पीएम किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना वर्षभरात ६ हजार रुपये देण्याची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली. शिवाय सातारा जिल्ह्यासाठी २ हजार ४५ कोटींचा निधी विकासकामांसाठी शासनाने दिला आहे, असे त्यांनी सांगितले. डोंगरी विकासाच्या २०० कोटींच्या प्रस्तावांनाही मान्यता देण्यात येईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.
आळे येथे विजेचा लपंडाव सुरु; शेतकरी छेडणार वीजपुरवठ्यासाठी आंदोलन
२. राज्यातील अनेक भागात उन्हाचा कडका चांगलाच वाढला आहे. या कडक उन्हाळ्यात पिकांना दररोज पाणी देणे गरजेचे असताना सध्या विजेचा लपंडाव सुरू आहे. महावितरणने येत्या दोन दिवसांत वीजपुरवठा सुरळीत न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आळे येथील शेतकऱ्यांनी अधिकाऱ्याला दिला आहे.
आळे या गावातून पिंपळगाव जोगे धरणाचा कालवा गेला आहे. आणि या कालव्यावर अनेक गावातील शेतकऱ्यांनी विविध पिके फुलविली आहेत. मात्र या भागात पाच पाच मिनिटाला वीज गायब होत असल्याचा आरोप या भागातील शेतकऱ्यांनी केला आहे. पाणी असून देखील विजे अभावी पिके सुकून चालल्याने नुकसान होत असल्याने त्रस्त शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
भारतीय शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली जयपूर येथे पुन्हा एकदा शेतकरी आंदोलन,भारतीय किसान संघाची माहिती
३. राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा आंदोलनाच्या मार्गावर आहेत. भारतीय किसान संघाच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील शेतकरी 16 मे रोजी हुतात्मा स्मारकापासून रॅलीच्या रूपात सचिवालयावर घेराव घालणार आहेत. शेतकऱ्यांनी विविध समस्यांवर तोडगा काढण्याची मागणी केली आहे. भारतीय किसान संघातर्फे शनिवारी पिंक सिटी प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आलीये.
संघटनेच्या पदाधिकार्यांनी राज्यातील शेतकर्यांना जयपूर येथे जाऊन आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी आणि राज्यातील कृषी विकास दर वाढवण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना स्वस्त आणि करमुक्त कृषी निविष्ठा व कालव्याचे पाणी मिळणे आवश्यक आहे. प्रत्येक शेताला सिंचन.सर्व शेतकऱ्यांना पुरेशी, अखंडित, सिंचनासाठी मोफत वीज, पिकांच्या नुकसानीची भरपाई, या प्रमुख मुद्द्यांशी संबंधित मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार आहे.
'बोगस खते, बियाणे आढळल्यास गुन्हे दाखल करा',पालकमंत्री चंद्रकांत पाटलांचे निर्देश
४. आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांनी बी-बियाणे, खते आणि कीटकनाशकांच्या उपलब्धतेकडे लक्ष द्यावे, असे निर्देश पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. बोगस बियाणे, खते, बोगस कीटकनाशके बाजारात येऊ नयेत यासाठी तातडीने गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, असे निर्देशही
त्यांनी दिले आहेत. पुणे जिल्ह्याच्या खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते.बियाणे, कीटकनाशकांच्या बाबतीत जेथे तक्रारी आल्या तेथे तत्काळ चौकशी, अहवाल आणि गुन्हे दाखल करावेत. अशा प्रकरणांमध्ये कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे या बैठकीत चंद्रकांत पाटील म्हणाले.
राज्यात उन्हाचा कडाका वाढला,देशातील बहुतांश भागात 40 अंशांपेक्षा जास्त तापमानाची नोंद
५. हवामान विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, बहुतांश राज्यांमध्ये हवामानाचे स्वरुप पुन्हा एकदा बदलू शकतं. गेल्या आठवड्यापासून राज्यात उष्णतेचा कडाका चांगलाच वाढला आहे. विभागाच्या म्हणण्यानुसार, देशातील बहुतांश भागात 40 अंशांपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज दिल्लीत कमाल तापमान 42 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.
अधिक बातम्या:
चिंता वाढवणारी बातमी : यंदा दुष्काळ पडणार! खासगी संस्थेचा दावा...
बोगस खते, बियाणे आढळल्यास गुन्हे दाखल करा, मंत्री चंद्रकांत पाटलांचे निर्देश
अडचणीतील सहकारी बॅंकांना राज्य शासन सहकार्य करेल : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Published on: 14 May 2023, 12:24 IST