News

नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलनाचा अर्थव्यवस्थेला झळ बसत असत आहे. पंजाबसह हरियाणा, हिमाचल प्रदेश या राज्यांच्या परस्परावलंबी अर्थव्यवस्थेला साडेतीन हजार कोटी रुपयांचा फटका बसल्याचा अंदाज असोचेम या उद्योजकांच्या संघटनेने केला आहे.

Updated on 16 December, 2020 3:10 PM IST


नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलनाचा अर्थव्यवस्थेला झळ बसत असत आहे. पंजाबसह हरियाणा, हिमाचल प्रदेश या राज्यांच्या परस्परावलंबी अर्थव्यवस्थेला साडेतीन हजार कोटी रुपयांचा फटका बसल्याचा अंदाज असोचेम या उद्योजकांच्या संघटनेने केला आहे. याविषयीचे वृत्त अॅग्रोवनने दिले आहे. तर उत्तर रेल्वेनेही दोन हजार कोटी रुपयांहून नुकसान झाल्याचे म्हटले आहे.

 

कृषी कायद्यांविरोधात आधी पंजाबमध्ये आंदोलन केल्यानंतर शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीकडे मोर्चा वळविला असून सिंधू , टिक्री, गाझीपूर सीमेवर ठिय्या दिल्याने वाहतूक पुर्णपणे बंद पडली आहे. तर जयपूर महामार्गावरील वाहतूक रोखण्याचाही प्रयत्न झाला होता. याचा फटका उद्योग क्षेत्राला बसला असून असोचेमच्या दाव्यांनुसार नव्हे तर हिमाचल प्रदेश हरियाणा तसेच जम्मू-काश्मीरवरही परिणाम होतो आहे. वाहतूक ठप्प झाल्याने उद्योगांच्या पुरवठा साखळीवर गंभीर परिणाम होऊन ३५०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाजही या संघटनेने व्यक्त केला आहे. या चारही राज्यांची एकत्रित अर्थव्यवस्था १८ लाख कोटी रुपयांच्या आसपास आहे. मात्र शेतकरी आंदोलनामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतूक पुर्णत:  ठप्प झाली असून निर्यातीला हातभार लावणारे तयार कपडे निर्मिती, वाहनाचे सुटेभाग उत्पादन, सायकल, क्रीडा साहित्य उत्पादन करणाऱ्या उद्योगांमधील उलाढालीही थांबली आहे.

 

आंदोलनामुळे उत्पादकांना मागणीनुसार माल पुरवठा करण्यात येणाऱ्या अडचणी पाहता नाताळ सणाच्या काळात या उद्योगांच्या जागतिक बाजारपेठेती प्रतिष्ठेवर परिणाम होत असल्याची चिंता असोचेमचे अध्यक्ष डॉ. निरंजन हिरानंदानी यांनी व्यक्त केली. दुसरीकडे भारतीय उद्योगांचा महासंघ असलेल्या सीआसआयने ही रस्ते वाहतूक ठप्प झाल्याने मालवाहतुकीसाठी ५० टक्के अधिक कालावधी लागत आहे.  पुरवठा साखळीमुळे खर्चातही ८ ते १० टक्क्यांनी वाढ झाल्याचा निष्कर्ष काढला आहे. कोरोनामुळे आधीच अडचणीत आलेल्या उद्योगांना आता शेतकरी आंदोलनाचा फटका बसत आहे. पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश आणि राजस्थानातील तपासणी केल्यानंतर नाक्या दरम्यानची वाहतूक विस्कळित झाली आहे.

या आंदोलनावर वेळेत सर्वमान्य तोडगा नाही निघाला आर्थिक प्रगतीवर पुरवठा साखळीवर आणि लघु उद्योगावर याचा विपरित परिणाम होईल, असा इशारा सीआयआयचे उत्तर विभागाचे अध्यक्ष निखिल सोहनी यांनी दिला. रेल्वे विभागालाही या आंदोलनाचा फटका बसला आहे. उत्तर रेल्वेचे महाव्यवस्थापक आशुतोष गांगल यांनी शेतकरी आंदोलनामुळे रेल्वेचे २००० ते २४०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा केला आहे.

English Summary: Farmer Protest : Industry hit by Rs 3,500 crore
Published on: 16 December 2020, 03:09 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)