शेतकऱ्यांच्या व्यथा आणि कथा चा अभ्यास मी अनुभवला आहे. शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने प्रगती पथावर आणि समृद्ध करण्यासाठी राज्य शासनाने शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्यावर भर दिला असून याच माध्यमातून शेतकऱ्यांचे हित जोपासले जाईल, असा विश्वास राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला.
त्याचबरोबर त्यांनी शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यासाठी चे प्रस्ताव मोठ्या प्रमाणातसादर करण्याचे आवाहन केले. त्यावेळी ते म्हणाले की कृषी विभागाकडून ज्या काही योजना राबविल्या जातात. या योजनांचा लाभ हा गट शेती व शेतकरी उत्पादक कंपनी यांसह महिला शेतकऱ्यांना समोर ठेवून देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी सर्व प्रकारची पूर्वतयारी करतमोठ्या प्रमाणात शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून कृषी योजनांचा लाभ घ्यावा असेही त्यांनी यावेळी नमूद केले. मनरेगा अंतर्गत फळबाग लागवड इतर राज्यांनी 38 हजार हेक्टर चा उच्चांक गाठला असून भविष्यामध्ये अजून वाढ होईल असा विश्वास व्यक्त केला.
विकेल ते पिकेल ही राज्याच्या मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे संकल्पना शेतकऱ्यांना दिलासा द्यायचे काम करीत आहे. तसेच मागच्या वर्षी पाचशे रोपवाटिका चा लक्ष्यांक पूर्ण करून तो यंदा एक हजाराचा देण्यात आल्यामुळे बळीराजाला यातून नक्कीच दिलासा मिळेल यात शंका नाही. तसेच नॅनो युरियाचा उपलब्धते मुळे खतांचा अनावश्यक वापर टाळण्यास मदत होणार आहे. या द्रवरूप युरिया मुळे शेतकऱ्यांना चांगला पर्याय उपलब्ध होणार असून शेतकऱ्यांचे अनुभव बोलके ठरतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच द्रवरूप युरिया प्रमाणे डीएपी वर देखील कंपन्यांनी संशोधन करून शेतकऱ्यांना पर्याय उपलब्ध करून देण्याचे आवाहन करत प्रत्येक कंपनीने शेतकऱ्यां प्रति संवेदनशीलता दाखवून वाजवी दरात आपले तंत्रज्ञान उपलब्ध करून दिल्यास राज्य शासन त्यांना सर्वतोपरी मदत करेल असे आश्वासन ही मंत्री भुसे यांनी यावेळी दिले.
एकाच छताखाली पाच कृषी महाविद्यालय हे कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या संकल्पनेतून मालेगाव तालुक्यातील काष्टी परिसरातील अडीचशे हेक्टर क्षेत्रात साकारण्यात येत असल्याची माहिती देताना डॉ. प्रकाश पवार म्हणाले हे कृषी विज्ञान संकुला मार्फत कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचवून दिलासा देण्याचे काम करतील. तसेच प्रत्येक शेतकऱ्याची डीबीटी पोर्टल वर नोंदणी गरजेचे असून याकरिता केवळ आधार कार्ड व आधार लिंक मोबाईल ची आवश्यकता आहे. त्यामुळे केवळ एक पाणी अर्जाद्वारे कृषी विभागाच्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार असून प्रत्येक शेतकऱ्याने डीबीटी पोर्टल वर नोंदणी करण्याचे आव्हानही डॉक्टर पवार यांनी यावेळी दिले..
यावेळी उपस्थित असलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या सदस्यांना प्रातिनिधिक स्वरूपात खते व बियाणे विक्री परवाने राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. तर पाच शेतकरी उत्पादक कंपन्यांना नको कंपनीच्या वतीने नॅनो युरियाचे वाटप करण्यात आले.
Published on: 12 July 2021, 01:51 IST