केंद्र सरकारमार्फत देशात 10 हजार शेतकरी उत्पादक कंपन्या करण्याची योजना राबविण्यात येत असून या कंपन्या तयार करण्याकरता समूह आधारित व्यावसायिक संस्था यांची नियुक्ती राज्यात करण्यात आले आहे.
या नियुक्त करण्यात आलेल्या संस्थांची बैठक कृषिमंत्र्यांनी मंत्रालयात घेतली. देशात दहा हजार शेतकरी उत्पादक कंपन्या तयार करण्यासाठी ची योजना यशस्वी करण्याकरता पीकपद्धती, कृषी विद्यापीठे, विविध सेवाभावी संस्था त्यांच्या विविध कार्यक्रमाचे सांगड घालावी. या शेतकरी उत्पादक कंपन्या केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात शेतकऱ्यांना यांचा फायदा व्हावा, असे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. या बैठकीच्या वेळी कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवलेतसेच विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना या उत्पादक कंपन्यांचा प्रत्यक्षात लाभ व्हावा, त्यांची प्रगती व्हावी, तसेच शेतकऱ्यांना शेती संबंधित विविध तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देऊन कृषी उत्पादनात वाढ व्हावी याला सुसंगत असे काम संस्थांनी करावे, अशा प्रकारचे निर्देश कृषिमंत्र्यांनी यावेळी दिले या योजनेकरिता केंद्र शासनाने जी नियमावली ठरवून दिली आहे त्याचे पालन करतानाच शेतकरी उत्पादक संस्था केवळ कागदावर न राहता त्याचे प्रभावी अंमलबजावणीबाबत केंद्र शासनाला पत्राद्वारे कळविण्यात येईल, असे श्री. भुसे यांनी सांगितले.
महाराष्ट्रात कृषी विभागामार्फत येणारे वर्ष ही उत्पादकता वर्ष म्हणून साजरा करण्यात येणार आहे. रासायनिक खतांचा वापर 10% कमी करावा. शेततळ्याचे अस्तरीकरण कार्यक्रम यशस्वीरित्या राबविण्याचे आव्हान कृषिमंत्र्यांनी केले.
Published on: 25 March 2021, 02:31 IST