News

नांदरखेडा ता. शहादा(नंदुरबार) येथे शेतकरी उत्पादक कंपनी च्या माध्यमातून वनश्री जिनिंग फॅक्टरी सुरुवात करण्यात आली आहे. एखाद्या शेतकरी उत्पादक कंपनी ला असा प्रोजेक्ट देण्याची ही महाराष्ट्रातली पहिलीच वेळ आहे.

Updated on 11 October, 2021 10:05 AM IST

 नांदरखेडा ता. शहादा(नंदुरबार) येथे शेतकरी उत्पादक कंपनी च्या माध्यमातून वनश्री जिनिंग फॅक्टरी सुरुवात करण्यात आली आहे. एखाद्या शेतकरी उत्पादक कंपनी ला असा प्रोजेक्ट देण्याची ही महाराष्ट्रातली पहिलीच वेळ आहे.

हजार सभासद असलेल्या या शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून वनश्री जिनिंग फॅक्टरीची स्थापन करण्यात आले आहे. या जीनी कंपनीचे भूमिपूजन करण्यात आले असून येत्या काळात याठिकाणी 25 हजार जात्याची  सूतगिरणी देखील उभारले जाणार आहे.

 वनश्री जिनिंग कंपनी हा नंदुरबार जिल्ह्यातील पहिलाच प्रकल्प असून या प्रकल्पाचा खूप फायदा नंदुरबार जिल्ह्यातील व आसपासच्या तालुक्यांना होणार आहे.

या परिसरातील शहादा,तळोदा त्यातील तालुक्यांमध्ये कापसाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते.  आता या परिसरात शेतकरी उत्पादक कंपनी च्या माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या वनश्री जिनिंग कंपनीमुळे मध्य प्रदेश व गुजरात या ठिकाणी विक्रीसाठी द्यावा लागणारा कापूस आता स्थानिक जागेवरच विकता येणार आहे. 

या शेतकरी उत्पादक कंपनीचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या प्रयत्नातून पंधराशे शेतकऱ्यांच्या सभासदांना द्वारे जिनिंग व सूतगिरणीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कापूस पिकाला चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील कंपनीला सहकार्य करावे असे आवाहन चेअरमन अभिजित पाटील यांनी केले आहे.

English Summary: farmer producer company start jining presing factory in nandurbaar
Published on: 11 October 2021, 10:05 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)