आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की, कोर्टातील एखाद्या बाबी विरोधात असलेली लढाई म्हटलं म्हणजे वेळ तर जातेच परंतु त्यामध्ये खर्च देखील फार मोठा लागतो. त्यामुळे न्यायालयीन वाद असला तर तो टाळलेलेच बरा असे बरेच जण म्हणतात. 'शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये' अशी एक म्हण आपल्याकडे प्रसिद्ध आहे. परंतु बऱ्याचदा काही गोष्टी अशा घडतात कि त्यांच्याविरोधात न्याय मिळवण्यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्या शिवाय पर्याय राहत नाही.
नक्की वाचा:यंदा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा शिंदे की ठाकरे गट घेणार? फडणवीस म्हणाले...
परंतु न्यायालय हे महाराष्ट्रातील किंवा भारतातील असले तर बरे परंतु नायालय जर विदेशातील असेल तर विचार न केलेलाच बरा. परंतु शेतकऱ्यांनी एका प्रकरणात स्वित्झर्लंडमधील न्यायालयीन लढा जिंकला आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
2017 मध्ये स्वित्झर्लंड मधील सिजेंटा या कीटकनाशक कंपनीच्या औषधाच्या वापरामुळे महाराष्ट्रात तब्बल सहाशे शेतकऱ्यांना विषबाधा झाल्यामुळे त्यातील 23 शेतकऱ्यांचा यामध्ये मृत्यू झाला होता. या मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांमध्ये यवतमाळ येथील बंडू सोनुले या शेतकऱ्यांचा देखील समावेश होता.
नक्की वाचा:राज्यातील देवस्थान बोर्डाच्या जमिनी शेतकऱ्यांच्या नावे कधी होणार? शेतकरी आक्रमक
जेव्हा ही घटना घडली तेव्हा या कुटुंबाच्या मदतीसाठी महाराष्ट्र असोसिएशन ऑफ पेस्टिसाइड पोईजन पर्सन आणि पेस्टिसाइड ॲक्शन नेटवर्क इंडिया या दोन संस्था मदतीला आल्या व या संस्थांकडून सिजंटा या कंपनीच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. पासून ही याचिका म्हणजे जवळ जवळ तब्बल पाच वर्ष हे प्रकरण कोर्टामध्ये चालले.
शेवटी स्वित्झर्लंडमधील दिवाणी कोर्टाने सिजेंटा कंपनी च्या विरोधात निर्णय दिला व या लढ्यासाठी लागलेला सर्व खर्च करण्याचे आदेश देखील न्यायालयाने संबंधित सिजेंटा कंपनीला दिले आहेत. हा शेतकऱ्यांचा फार मोठा विजय मानला जात आहे.
नक्की वाचा:सिजेंटा कंपनीकडुन शेतक-याची फसवणुक;नुकसान भरपाईची मागणी
Published on: 27 August 2022, 02:08 IST