News

राज्यात सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीने सगळीकडे थैमान घातले होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. दिवाळी सणाच्या तोंडावर शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत

Updated on 05 November, 2021 8:29 PM IST

राज्यात सप्टेंबर  आणि ऑक्टोबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीने सगळीकडे थैमान घातले होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. दिवाळी सणाच्या तोंडावर शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत

या कारणांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी कडू होत असताना मंत्र्यांची दिवाळी गोड होऊ द्यायची नाही, म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे यांच्या नेतृत्वाखाली कृषी मंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव येथील निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान कृषिमंत्री म्हणाले की स्टंटबाजी आंदोलन न करता चर्चा करून आपले प्रश्न मार्गी लावू अशी हात जोडून विनंती केली..दरम्यान स्टंटबाजी या शब्दावर आंदोलन कर्त्यांनी आक्षेप घेऊन जोरदार घोषणाबाजी केली.

 या साऱ्या प्रकारा नंतर कृषी मंत्री दादा भुसे यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलकयाच्यामध्ये त्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली. या झालेल्या चर्चांमध्ये कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडून समाधानकारक उत्तरे आंदोलकांना मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या चर्चेमध्ये पिक विमा चे पैसे दिले नाही, दिवाळीपूर्वी अतिवृष्टीचे पैसे जमा होतील असे सांगितले मात्र ते झाले नाहीत

.त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी कडू म्हणून आम्हीसुद्धा मंत्र्यांची दिवाळी गोड होऊ देणार नसल्याचे सांगत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कृषी मंत्री दादा भुसे यांच्या बंगल्यावर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता.

English Summary: farmer movement in fron of home of agriculture minister dada bhuse
Published on: 05 November 2021, 08:29 IST