सध्या थकीत वीजबिल न भरल्यामुळे महावितरणकडून वीज पुरवठा खंडित करण्याचा मोहीम सुरू आहे. असाच प्रकार नाशिक जिल्ह्यातील पाच गावांमधील वीजपुरवठा महावितरणने कुठल्याही प्रकारची नोटीस न देता खंडित केला.
त्याच्या निषेधार्थ सिद्ध पिंपरी येथे संतप्त शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेच्या सात पदाधिकाऱ्यांनी वीज मनोऱ्यांना सात तास आंदोलन केले. या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत गावातील सर्व व्यवहार देखील बंद ठेवण्यात आले होते. महावितरण चे वरिष्ठ अधिकारी त्यांच्यामध्ये संभाषण आणि समन्वय नसल्याने हे आंदोलन चिघळत होते. शेवटी भाजपचे आमदार राहुल ढिकले,देवयानी फरांदे,शिवसेनेचे माजी आमदार योगेश घोलप, शंकरराव ढिकले, अनिल ढिकले यांनी यशस्वी मध्यस्थी केल्यानंतर रविवारी दुपारी एक तास वीज पुरवठा करण्यात आला. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
सध्या सगळीकडे कांदा लागवड तसेच द्राक्ष बाग हे महत्वाच्या टप्प्यावर असल्याने त्यांना पाण्याची नितांत गरज असते. तसेच पाळीव जनावरांना देखील प्यायला पाणी लागते. या सगळ्या पार्श्वभूमीवर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी सकाळी दहा वाजेपासून कुठलीही पूर्वसूचना न देता सिद्ध पिंपरी,ओढा, विंचूर गवळी या गावातील वीजपुरवठा खंडित केला होता. तो रविवारी सकाळपर्यंत देखील सुरळीत न झाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला. परंतु थोड्या काळातच शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत गावाबाहेर असलेल्या उच्च दाब विद्युत वाहिनीवरील मनोऱ्यावर चढण्यास व आंदोलनाला सुरुवात केली.
शेतकऱ्यांना वाढीव वीज बिले देऊन आमची फसवणूक करण्यात येते आम्ही बिले भरण्यास तयार आहोत मात्र जेवढी युनिट वापरले त्याच बिल द्यावे. तसेच रात्री ऐवजी दिवसा वीज पुरवठा उपलब्ध करून द्यावा या मागण्या त्यांनी केल्या. आंदोलन ठिकाणी पोहोचलेले खासदार हेमंत गोडसे,आमदार देवयानी फरांदे, राहुल ढिकले, माजी आमदार योगेश घोलप या सर्वांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून महावितरण च्या चुकीच्या धोरणा विरोधात नाराजी व्यक्त केली.
Published on: 31 January 2022, 11:04 IST