नवी दिल्ली : शेतकरी नेते राकेश टिकैत यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लखीमपूर खेरी येथून टिकैत दिल्लीला येत होते. खुद्द टिकैत यांच्या ट्विटर हँडलवरून ही माहिती सार्वजनिक करण्यात आली आहे.
या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, "सरकारच्या इशाऱ्यावर काम करणारे दिल्ली पोलिस शेतकऱ्यांचा आवाज दाबू शकत नाहीत. शेवटच्या श्वासापर्यंत हा संघर्ष सुरूच राहील. लखीमपूर खेरीतील आंदोलनानंतर राकेश टिकैत आपल्या समर्थकांसह दिल्लीत पोहोचले. मात्र माहिती मिळताच पोलिसांनी त्यांना पुढे जाऊ दिले नाही.
हे ही वाचा: शेतकऱ्यांनो 'या' कारणाने दुधाची फॅट होते कमी; फॅट वाढविण्यासाठी वापरा हे तंत्र
या बदल्यात शेतकरी नेत्यांनी त्यांच्या समर्थकांसह रस्त्यावरच आंदोलन करण्यास सुरुवात केली, यावर कारवाई करत दिल्ली पोलिसांनी सर्वांना अटक करून मधु विहार पोलिस एसीपी कार्यालयात नेले आहे.
यानंतर टिकैत यांनी एक व्हिडिओ मेसेज जारी करून प्रश्न उपस्थित केला आहे की, दिल्लीत शेतकऱ्यांच्या प्रवेशावर बंदी आहे का? सोबतच त्यांनी असा सवालही केला की, कोणी हिरवे ब्लँकेट आणि चादर घालून दिल्लीला जाऊ शकत नाही का? जंतरमंतरवर बेरोजगारीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती टिकैतने या व्हिडिओमध्ये दिली आहे.
हे ही वाचा: Gujarat Election: गुजरातमध्ये होणार महामुकाबला! केजरीवाल ठोकणार गुजरातमध्ये तळ..
Published on: 21 August 2022, 03:51 IST