कोल्हापूर
तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव उद्या (दि.१) ऑगस्ट रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. राव उद्या कोल्हापूरमध्ये येत असून वाटेगावमध्ये आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील उपस्थित राहणार असून राव त्यांच्या घरी देखील जाणार आहेत. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
के.चंद्रशेखर राव उद्या कोल्हापूर दौऱ्यावर असणार आहेत. त्यानंतर ते आण्णाभाऊ साठे जयंतीला उपस्थित राहणार आहेत. रघुनाथ दादा पाटील यांच्या घरी राव यांची दुपारची भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानंतर राव कोल्हापूरमधील अंबाबाईचे दर्शन घेऊन ते हैद्राबादला रवाना होणार आहेत.
मागील काही दिवसांपासून के.चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात बीआसएस पक्ष विस्ताराला सुरुवात केली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी बीआसएसने चांगली मोर्चेबांधणी सुरु केली आहे. तसंच अनेक नेत्यांनी बीआसएसमध्ये पक्षप्रवेश देखील केला आहे.
दरम्यान, केसीआर मंगळवारी (ता.१) सकाळी दहा वाजता कोल्हापूरमध्ये पोहोचणार आहेत. त्यानंतर वाटेगावमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला ते हजेरी लावणार आहेत. त्यावेळी ते रघुनाथदादा पाटील यांच्या घरी जाणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे रघुनाथदादा लवकरच बीआरएसमध्ये प्रवेश करणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.
Published on: 31 July 2023, 05:09 IST