News

शेतकरी अनेक संकटाचा सामना करत आहे. कधी अवकाळी पाऊस तर दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. असे असताना केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांनी एक मोठा दावा केला आहे. देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न (Farmer Income) दुप्पट करण्याची संकल्पना आम्ही मिशन म्हणून हाती घेतली आहे.

Updated on 14 October, 2022 12:04 PM IST

शेतकरी अनेक संकटाचा सामना करत आहे. कधी अवकाळी पाऊस तर दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. असे असताना केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांनी एक मोठा दावा केला आहे. देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न (Farmer Income) दुप्पट करण्याची संकल्पना आम्ही मिशन म्हणून हाती घेतली आहे.

तसेच उत्पन्न वाढत असल्याचे माझ्याकडे पुरावे आहेत. कोणाला खात्री करायची असल्यास मी स्वतः मदत करण्यास तयार आहे, असा दावा कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांनी केला आहे. यामुळे याची चर्चा सुरु आहे. सध्या अनेक शेतकरी हे आर्थिक संकटात असताना कृषी मंत्र्यांचे हे वक्तव्य सध्या चर्चेचा विषय बनत आहे.

ते म्हणाले, शेतकऱ्यांचे उत्पन्न विविध भागांत दुप्पट, सहा पट, तर आठ पटीपर्यंत वाढले आहे. शंका असलेल्यांनी माझ्याकडे यावे. त्यांना शेतकऱ्यांचे पत्ते मी देईनच पण प्रवास भाडेदेखील देईल. त्यांनी अशा शेतकऱ्यांच्या भेटी घ्याव्यात आणि फक्त राजकीय अंगाने न बघता स्वतःच काय ते सांगावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

बारामतीत मुसळधार पावसाचे थैमान, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

तसेच विमा योजनेबाबत सातत्याने चर्चा होत असते. सूचना येतात. सुधारणाही चालू असतात. आता देखील आम्ही राज्यांसोबत चर्चा करीत योजनेच्या विविध प्रारूपांना पुढे नेतो आहोत. नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई कमी समस्यांना तोंड देत मिळावी, असा आमचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

यंदा अतिरिक्त उसाचा प्रश्न मिटणार? ३५ साखर कारखान्यांनी घेतली ऊस गाळप सुरू करण्याची परवानगी

तसेच केंद्राप्रमाणेच राज्य सरकार देखील विम्याच्या विविध मॉडेलवर काम करीत आहेत. शेतकऱ्यांना चार पैसे मिळावेत, हाच प्रयत्न सध्या मोदी सरकारचा आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता चांगले दिवस येणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या;
Maharashtra Monsoon: उद्यापासून परतीचा मान्सून माघारी फिरणार, शेतीच्या कामांना येणार वेग..
50 हजारांच्या प्रोत्साहन अनुदानाची ऑनलाईन यादी जाहीर, शेतकऱ्यांनो तुमचं नाव करा चेक..
गहू उत्पादक राज्यात गव्हाचा तुटवडा, किंमतीत 5 टक्क्यांची वाढ..

English Summary: Farmer Income: I have evidence farmers income increasing, Union Agriculture Minister
Published on: 14 October 2022, 12:04 IST