News

मोदी सरकारने 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी एक नियोजनबद्ध कार्यक्रम देखील आखण्यात आलेला आहे.

Updated on 01 April, 2022 7:42 AM IST

मोदी सरकारने 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी एक नियोजनबद्ध कार्यक्रम देखील आखण्यात आलेला आहे.

परंतु देशातील काही राज्यांमध्ये शेतकऱ्यांच्या उत्पन्नात कमालीची घट झाली असल्याचे संसदीय समितीने सांगितले. याबद्दलची सविस्तर माहिती अशी की,  2016 ते 2022 या काळामध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. या उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी उपाय सुचवण्यासाठी आंतर मंत्रालय समिती देखील स्थापन केली.

नक्की वाचा:तब्बल 736 दिवसांनी सर्वच नागरिकांची मास्कपासून मुक्ती, ठाकरे सरकारची मोठी घोषणा

या समितीने ज्या काही शिफारशी सुचवल्या त्या लागू करण्यासाठी आणि  अंमलबजावणी देखरेख करण्यासाठी 2019 मध्ये पुन्हा एका समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सात उपाय सुचवले होते त्यामध्ये पशुधनाची उत्पादकता तसेच पिकांची उत्पादकता वाढवणे, उत्पादन खर्चामध्ये कपात करणे, पीक घनता वाढवणे व अधिक मूल्य असलेल्या पिकांचे लागवड व शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दरात वाढ करणे  आणि शेती व्यवसायातून इतर व्यवसायात स्थलांतर करणे हे उपाय संबंधित समितीने सुचवले होते.

एवढे करुन देखील केंद्र सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट पासून खूप दूर आहे, तसेच संसदीय समितीने नुकतेच सांगितले. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे ही गोष्ट तर लांबच राहिली परंतु काही राज्यांमध्ये शेतकऱ्यांची उत्पन्नात घट झाली असल्याचे  निष्कर्षदेखील या समितीने मांडला. आता देशातील या चार राज्यांमध्ये झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा आणि नागालॅंड या राज्यांचा समावेश आहे. या राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी होण्यामागे कोणकोणती कारणे आहेत. हे शोधणे महत्त्वाचे आहे म्हणून हे कारणे शोधण्यासाठी समिती स्थापन करा, पुन्हा या समितीने सुचविलेल्या शिफारशी नुसार उपाय करा अशा सूचनाही संसदीय समितीने केल्या.

नक्की वाचा:Gudi Padwa 2022: गुढी पाडव्याला आहे खास महत्त्व; जाणून घ्या या दिवसाचं वैशिष्ट

हे उद्दिष्ट पूर्ण करण्याची जबाबदारी हे सरकारचे विविध विभागवर आहेत. या विभागांवर तसेच संबंधित संस्था आणि मंत्रालयावर आहे. यामध्ये कृषी विभागाचा वाटा हा महत्त्वपूर्ण आहे.

अशा रीतीने या चार राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले

1- झारखंड - 7000 रुपयांवरून 4 हजार 895 रुपयांवर आले.

2- मध्य प्रदेश - शेतकऱ्यांचे उत्पन्न बाजार 740 रुपये होते ते आता आठ हजार 339 पर्यंत पर्यंत कमी झाले.

3- नागालँड- 11428 रुपयांवरून उत्पन्न 9877 रुपयांपर्यंत घटले.

4- ओडिशा- शेतकऱ्यांचे उत्पन्न अवघ्या पाच हजार 274 रुपये

English Summary: farmer income decrease in four state parlaimentry comitee report
Published on: 01 April 2022, 07:42 IST