सध्या राज्याच्या राजकारण ढवळून निघत असताना राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे हे देखील शिंदे गटात सामील झाल्याने गुवाहाटीत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले राज्याचे कृषी आयुक्त धीरजकुमार यांचा ताफा शेतकऱ्यांनी अडवला विविध प्रकारच्या मागण्या आणि गाऱ्हाने मांडले.
शेतकऱ्यांनी मांडलेल्या तक्रारीमध्ये नांदेड जिल्ह्यातील बोगस बियाणे, त्यांची होत असलेली लिंकिंग आणि सोयाबीन पीक कापणी प्रयोग इत्यादी मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी हा अडवला
यानंतर कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी देखील शेतकऱ्यांच्या सगळे म्हणणे ऐकून घेतले व योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन देखील दिले.
नक्की वाचा:Political Earthquake: बंडखोर आमदारांनी महाविकास आघाडी सरकारचा काढला पाठिंबा, याचिकेत दावा
शेतकऱ्यांनी तक्रारींचा वाचला पाढा
राज्याच्या कृषी विभागाने सोयाबीनचे नामांकित कंपन्यांचे सॅम्पल घेतले होते. परंतु या बियाण्याची उगवण क्षमता अवघे 10 ते 15 टक्केच आहे.
असे असताना देखील या विरोधात कृषी विभागाने कुठल्याही प्रकारची संबंधित कंपन्यांवर कारवाई केली नाही. एवढेच नाही तर असल्या मालाची विक्री देखील अजून पर्यंत थांबवली नाही.
अशीच परिस्थिती खतांची असून खतांचे बोगस नमुने आले आहेत. जर आपण या जिल्ह्याचा विचार केला तर येथून आजूबाजूच्या परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात खतांची व बियाण्यांची खरेदी करतात
परंतु खत विक्री मध्ये देखील नको ती लिंकिंग करण्यात येत असून नको असलेल्या आर्थिक भुर्दंड शेतकऱ्यांवर पडत आहे.
नक्की वाचा:बफर स्टॉक राखण्यासाठी नाफेडमार्फत केंद्र सरकारची 52,460 टन कांदा खरेदी
नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील पार्डी याठिकाणी धीरज कुमार यांचा पाठवला. हे सगळे शेतकऱ्यांचे एक तक्रारी ऐकून घेत लवकरच यावर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी शेतकरी संघटनेच्या वतीने कृषी आयुक्त धीरजकुमार यांना एक निवेदन देखील देण्यात आले असल्याची माहिती आली आहे.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार 18:18:10 खताचा अनावश्यक असलेला प्रकार नांदेड जिल्ह्यात झाला असून त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आले नसल्याची माहिती देखील शेतकरी संघटनेचे नेते संतोष गव्हाणे यांनी दिली.
नक्की वाचा:रेल्वे अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार; शेतकऱ्यांची १५० एकर शेती पाण्यात
Published on: 27 June 2022, 10:14 IST