News

शेती आणि कृषी शास्त्रज्ञ यांचे एक जवळचे नाते आहे. कृषी क्षेत्रातील शास्त्रज्ञ हे विविध पिकांच्या बाबतीत सखोल संशोधन करून शेतकऱ्यांना पिकांच्या चांगल्या उत्पादनक्षम जाती विकसित करून त्यांच्या उत्पादन वाढीमध्ये एक प्रकारचा मोलाचा हातभार लावत असतात.

Updated on 24 January, 2022 12:20 PM IST

शेती आणि कृषी शास्त्रज्ञ यांचे एक जवळचे नाते आहे. कृषी क्षेत्रातील शास्त्रज्ञ हे विविध पिकांच्या बाबतीत सखोल संशोधन करून शेतकऱ्यांना पिकांच्या चांगल्या उत्पादनक्षम जाती विकसित करून त्यांच्या उत्पादन वाढीमध्ये एक प्रकारचा मोलाचा हातभार लावत असतात.

आपण आजपर्यंत पाहिले आहे की, ऊस या पिकाचे किंवा इतर कुठलेही पिकाचे विक्रमी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात येतो. परंतु शेतकऱ्यांनी शास्त्रज्ञांचा सन्मान करण्याची घटना प्रथमच घडली आहे.

 पाडेगाव ऊस संशोधन केंद्रावर येऊ शेतकऱ्यांनी शास्त्रज्ञांचा सन्मान केला कारण या शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनामुळेच उसाचे एकरी 126 टन उत्पादन घेणे शक्‍य झाल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

पाडेगाव येथील प्रगतिशील शेतकऱ्यांनीपाडेगाव ऊस संशोधन केंद्रातील ऊस विशेषज्ञडॉ.भरत रासकर, डॉ.रामदास गारकर, डॉ.सूरज नलावडे या व इतर संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ व कर्मचाऱ्यांचा पाडेगाव येथे येऊन सन्मान केला.याबाबत बोलताना प्रगतशील शेतकरी विकास चव्हाण म्हणाले की पाडेगाव ऊस संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनामुळेच जास्तीचे ऊस उत्पादन घेणे शक्‍य झाले व उत्पादनाचे सातत्य टिकवून ठेवता आले. तसेच सुरू उसाचे एकरी 126 टन ऊस उत्पादन तर खोडवा उसाचे एकशे दहा टन उत्पादन मिळत असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली. 

ऊस विशेषज्ञ कार्यरत असेपर्यंत व निवृत्तीनंतरही इंटरनेटच्या माध्यमातून त्यांच्या संपर्कात राहण्यासाठी शेतकरी विकास चव्हाण, राहुल सणस, विकास वाळुंज, सोमनाथ हुलगे, सौरभ कोकीळ, उत्तम जाधव अशा  मिळून तेरा शेतकऱ्यांनी मिळून विशेषज्ञांचा सत्कार केला व ऊस विशेषज्ञ डॉ. भरत रासकर यांना लॅपटॉप भेट दिला.(संदर्भ-सामना)

English Summary: farmer hounoured to cane scientist of padegaon cane reaserch center
Published on: 24 January 2022, 12:20 IST