News

नुकत्याच काही महिन्यांपूर्वी संपूर्ण राज्यात गांजाच्या शेती साठी परवानगी द्या म्हणून जिल्हाधिकाऱ्याला लिहिलेले पत्र प्रचंड व्हायरल झाले होते. या पत्रानंतर राज्यात मराठवाड्यात, तसेच पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर मध्ये गांजा शेती फुलवण्याचे शेतकऱ्यांचे नसते धाडस संपूर्ण महाराष्ट्रने बघितले. आता पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातुन गांजाचा मळा फुलवला गेला असल्याचे वृत्त समोर आले आहे. या माथेफिरु शेतकऱ्याने चक कांद्याचा मळ्यात गांजाची शेती सर्रासपणे केल्याचे उघड झाले आहे. कांद्याच्या मळ्यात 105 गांज्याची रोपे फुलवली होते, पोलिसांना गुप्त सूत्रानुसार याबाबत माहिती पडताच पोलिसांनी कारवाई करत संबंधित शेतकऱ्याला गजाआड केले आहे.

Updated on 29 January, 2022 8:01 PM IST

पोलिसांनी गुप्तचर सूत्रांच्या माहितीनुसार मनमाड तालुक्यातील ममदापूर शिवारात धडक कारवाई करत, एका शेतकऱ्याने गांजाचा मळा फुलवला असल्याचे उघड झालं आहे. मनमाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ममदापूर शिवारातील दुर्गम भागात तीस वर्षीय देविदास रामचंद्र सोनवणे यांनी चक्क कांद्याच्या शेतात 105 कांद्याची रोपे फुलवण्याचा नसता उपक्रम राबविला होता. याबाबत पोलिसांना ज्ञात होताच संबंधित ठिकाणी धाड टाकून 150 किलो वजनाचा गांजा जप्त केला आहे. पोलिसांनी वाळलेला गांजा तब्बल 30 किलो जप्त केला तर ओला गांजा 400 ग्राम आहे. पोलिसांनी एकूण 11 लाख रुपयांचा गांजा जप्त केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी कारवाई करत वेगवेगळ्या कलमांद्वारे संबंधित आरोपी शेतकऱ्याला पोलिस कोठडी सुनावली आहे.

मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, आपल्या देशात सर्वत्र अमली पदार्थांचे विक्री व उत्पादन कायद्याने प्रतिबंधित करण्यात आले आहे. गांजा देखील एक अमली पदार्थ आहे आणि याची शेती करणे कायद्याने गुन्हा आहे. याबाबत शेतकऱ्यांना माहिती असताना देखील यांची शेती केली जाते. मात्र यामुळे शेतकऱ्यांचा फायदा तर होतच नाही पण शेतकऱ्यांना विनाकारण तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागते.

शेतकऱ्यांनी गांजाचा मळा फुलवून्यापेक्षा शेती क्षेत्रात नवनवीन नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून आपले व आपल्या कृषिप्रधान देशाचे नाव जगाच्या पाठीवर झळकविले पाहिजे. या अशा कृत्यामुळे आपण आपल्या येणाऱ्या पिढीवर चुकीचे संस्काराचे बीजारोपण करत आहोत त्यामुळे केवळ काही पैशांच्या हव्यासापोटी असे कृत्य करू नये.

English Summary: farmer has planted a cannabis field in onion; Police took him into custody
Published on: 29 January 2022, 08:01 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)