पिक कर्ज हे शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे असून शेतीच्या कामामध्ये लागणारा पैसा या माध्यमातून शेतकऱ्यांना उपलब्ध होतो. परंतु बँकेकडून कर्ज घ्यायचे म्हटले म्हणजे सगळ्यांना याचा चांगला अनुभव आहे.
कागदपत्रांची पूर्तता करत करत नाकीनऊ येतात. इतकेच नाही तर सगळे पूर्तता केल्यानंतर देखील कर्जमंजुरी पर्यंत बँकेच्या खेट्या बऱ्याचदा घालाव्या लागतात. त्यामुळे बऱ्याचदा ज्या गोष्टीसाठी कर्ज हवे असते त्याची वेळ निघून गेल्यानंतर कर्ज हातात मिळते.
ही सत्य परिस्थिती आहे.परंतु आता शेतकऱ्यांना या कटकटीतून मुक्तता मिळू शकते अशा आशयाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे राज्यामध्ये वेगवेगळ्या बँकांकडून पिक कर्ज वाटप करण्यासाठीची जी पद्धत आहे
ती बदलून येणाऱ्या रब्बी हंगामापासून ती ऑनलाइन करण्याचे प्रयत्न राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या पुढाकाराने सुरू आहे.याबाबत जोरात तयारी सुरू असून काही व्यापारी बँकांनी यासाठीचे सॉफ्टवेअर देखील तयार करून यासंबंधीचे प्रयोग सुरू आहेत.
व्यापारी बँकां प्रमाणेच राज्यातील जिल्हा बॅंकांचे देखील यामध्ये सहभाग नोंदवावा यासाठी सहकार आयुक्तालयाने सूचना दिली असून पुढील दोन महिन्यातया योजनेला मूर्त स्वरूप येण्याची अपेक्षा आहे.
सहकार आयुक्तालयात आयुक्त अनिल कवडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच या बाबतीत एक महत्त्वपूर्ण बैठक झाली.
झालेल्या या बैठकीत विविध बँकेच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत महाराष्ट्र ग्रामीण बँक कडील ऑनलाईन पीक कर्ज वाटपाचे जे काही सॉफ्टवेअर आहे त्याचे प्रेझेंटेशन देखील करण्यात आले
.मागील काही महिन्यांपासून सहकार विभागाकडून या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. या सॉफ्टवेअर साठी महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि काही व्यापारी बँक प्रयत्न करत आहेत.
नक्की वाचा:शेतकऱ्यांचा विजय! 'या' जिल्ह्याला मिळणार कपाशीचे नुकसान भरपाईपोटी 11 कोटींचा निधी
या पद्धतीचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे शेतकरी जेव्हा ऑनलाईन पीक कर्जासाठी यामध्ये अर्ज करतील तर त्यांना कोणतीही बँक आणि शाखेची निवड करता आली पाहिजे अशी सिस्टीम यामध्ये विकसित करण्यात येणार आहे.
शिवाय शेतकऱ्यांनी जी शाखा निवडली असेल या संबंधित बँकेत शाखेने शेतकऱ्यांच्या पीक कर्ज मागणीच्या अर्जाची छाननी करून कर्ज वाटपाचा निर्णय घ्यायला हवा.
येणाऱ्या पुढील दोन महिन्यात व्यापारी आणि काही जिल्हा बँकांकडून ऑनलाईन पीक कर्ज वाटपाच्या प्रयोगाचे अंमलबजावणी सुरू करण्याचा प्रयत्न आहे.
यासाठी राज्यस्तरीय बँकर्स समितीकडून सर्वांना मान्य असेल असे सॉफ्टवेअर तयार करण्यात येत असून इतर रब्बी हंगामातील प्रणाली अमलात आणण्यात येणार असल्याचे देखील अधिकाऱ्यांनी सांगितले.
नक्की वाचा:मोठी बातमी : "शिवसैनिकांनो नव्या चिन्हासाठी तयार राहा"; उद्धव ठाकरेंचे मोठे विधान
Published on: 08 July 2022, 03:06 IST