आपल्या देशातील 90 टक्के लोक शेती व्यवसाय करून आपली आणि आपल्या कुटुंबाची उपजीविका करत असतात. 90टक्क्यांपेक्षा जास्त लोक शेती करत असल्यामुळे तसेच शेतीमधील विविधतेमुळे आपल्या देशाला कृषिप्रधान देश म्हणून संबोधले जाते.आपल्या देशातील सगळे शेतकरी बांधव शेतीबरोबरच पशुपालन, शेळीपालन, मत्स्य व्यवसाय, दुग्धव्यवसाय इत्यादी प्रकारचे जोड व्यवसाय करून आपले उत्पन्न वाढवत असतात. शेतकरी राजा आपल्या शेतामध्ये हंगामानुसार वेगवेगळी पिके घेत असतो.
चारा मोठ्या प्रमाणात वाया जातो:
शेतामध्ये ऊस, कापूस, ज्वारी, बाजरी, मका, कडवळ, मूग,कांदा या पिकांची लागवड शेतकरी प्रामुख्याने करत असतो. शेतीमधील ज्वारी बाजरी आणि मका ही करण्यामागे शेतकऱ्याचे 2 फायदे असतात एक तर त्यापासून धान्य मिळते आणि राहिलेल्या पिकाचा उपयोग तो जनावरांसाठी चारा म्हणून करत असतो.अनेक शेतकरी आपल्या जनावरांना चारा किंवा वैरण विळखी ने कापून टाकतात परंतु जनावरांना ते नीट खाता येत नाही तसेच चारा मोठ्या प्रमाणात वाया सुद्धा जातो. जरी तो कुजवून खत करणायचे ठरवले तरी ते शक्य होत नाही. यामधून चाऱ्याचे योग्य व्यवस्थापन करायचे असेल तर कडबाकुट्टी हा एकमेव पर्याय आहे.
कडबाकुट्टी मुळे अनेक फायदे होतात जनावरांना चारा योग्य प्रकारे खाता येतो तसेच जरी जनावरांनी चारा खाऊन शिल्लक जरी राहिला तरी ते उकिरड्यात टाकून त्यापासून खत सुद्धा बनवले जाऊ शकते. चारा लहान आणि बारीक असल्यामुळे जनावरांचे आरोग्य सुद्धा सुधारते.जर तुम्हाला कडबाकुट्टी घ्यायची असेल तर आता सरकार तुम्हाला 75 टक्के अनुदान देणार आहे. बाजारात जर का कडबाकुट्टी घ्यायची झाली तर कमीत कमी 20 हजारांच्या पुढे कडबाकुट्टी चे भाव आहेत. परंतु तुम्ही योग्य कागदपत्रांची पूर्तता केली तर तुम्हाला कडबाकुट्टी खरेदी वर 75 टक्के अनुदान मिळणार आहे आणि बक्कळ पैसा तुमचा वाचणार आहे आणि हे शेतकरी वर्गाच्या फायदेशीर ठरेल.
जिल्हा परिषद अनुदान योजना:-
जिल्हा परिषद अंतर्गत ही योजना आहे. कडबाकुट्टी वर 75 टक्के अनुदान मिळवण्यासाठी काही नियम आणि अटी लागू केल्या आहेत.
1) योजनेमध्ये अर्ज केलेला शेतकरी हा ग्रामीण भागातील शेतकरी असावा.
2)शेती करणारा अनिर्वाय आहे.
3)आणि राष्ट्रीय बँकेत खाते असणे गरजेचे आणि आवश्यक.
योग्य कागदपत्रांची पूर्तता:-
75 टक्के अनुदानित कडबाकुट्टी मिळवण्यासाठी खाली कागदपत्रे असणे आवश्यक:-
1)राष्ट्रीयकृत बँकेच्या पहिल्या पानांची झेरॉक्स
2)जमिनीचा 7/12 आवश्यक तसेच त्याबरोबर शेतीचा 8 A उतारा.
3)घराचे वीज आणि आधारकार्ड आवश्यक आहे
या सर्व कागदपत्रांची पूर्तता करून या योजनेचा आपण लाभ घेऊ शकतो.
Published on: 10 February 2022, 12:26 IST