News

मराठवाडयात पूढील पाच दिवस पूर्णत: ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागाने (Department Meteorology) वर्तविली आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.

Updated on 19 July, 2022 5:26 PM IST

मराठवाडयात पूढील पाच दिवस पूर्णत: ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागाने (Department Meteorology) वर्तविली आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.

दिनांक 22 जुलै रोजी हिंगोली, नांदेड व लातूर जिल्हयात तर दिनांक 23 जुलै रोजी हिंगोली व नांदेड जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी (farmers) कृषी सल्ला (Agricultural Consultancy) नुसार पिकांची माहिती घेणे गरजेचे आहे.

सेतु चालकाकडून 68 शेतकऱ्यांची फसणवुक; शेतकऱ्यांची 'इतकी' रक्कम केली वसूल

कृषी सल्ल्यानुसार पिकाचे व्यवस्थापन असे करा

कापूस

ज्या ठिकाणी जास्त पाऊस झालाय अशा भागातील कापूस पिकात (cotton crop) वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते काढण्याची व्यवस्था करावी. कापूस (cotton) पिकात आकस्मिक मर किंवा मूळकुज दिसून असल्यास कॉपर ऑक्सीक्लोराईड 25 ग्रॅम + युरीया 200 ग्रॅम + पांढरा पोटॅश 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणात घेऊन हे द्रावण झाडाच्या मूळाजवळ प्रति झाड 100 मिली द्या.

कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या (मावा, तूडतूडे) किडींचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्क किंवा र्व्हीटीसीलीयम लिकॅनी 40 ग्रॅम किंवा ॲसिटामाप्रिड 20% 60 ग्रॅम किंवा डायमिथोएट 30% 260 मिली प्रति एकर पावसाची उघाड बघून फवारणी करा.

गोगलगायींच्या नियंत्रणासाठी कापूस (cotton) पिकामध्ये दाणेदार मेटाल्डिहाईड दोन किलो प्रति एकर याप्रमाणात शेतात पसरून द्यावे.

 बाईक खरेदी करताय? तर नितीन गडकरींची ही मोठी घोषणा पहाच; होईल मोठा फायदा...

सोयाबीन

अधिक पाऊस झालेल्या भागातील सोयाबीन पिकात (soybean crop) वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते काढण्याची व्यवस्था करावी. सोयाबीन पिक पिवळे पडत असल्यास (क्लोरोसीस) याच्या व्यवस्थापनासाठी शेतात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते काढण्याची व्यवस्था करा व नंतर सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड-2 ची 50 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करा.

पहिल्या फवारणीने पाने हिरवी न झाल्यास परत आठ दिवसांनी दूसरी फवारणी करा. सध्या बऱ्याच ठिकाणी सोयाबीन पिकामध्ये शंखी गोगलगायीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी शेतातील (agriculture) गोगलगायी गोळा करून साबणाच्या किंवा मिठाच्या पाण्याने फवारणी करून मारा.

ई-पीक पाहणीबाबद सरकारचा मोठा निर्णय; आता शेतकऱ्यांना होणार फायदाच फायदा

English Summary: Farmer friends Take care crops agricultural advice
Published on: 19 July 2022, 05:26 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)