News

सध्या राज्यात अफूची शेती केल्याचे प्रकार समोर येत आहेत. अशातच जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वाळकी येथील एक असाच भयानक प्रकार समोर आला आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती अशी की चोपडा तालुक्यातील वाळकी येथील एका शेतकऱ्याने तब्बल साडेतीन एकरावर अफूची लागवड केलेली होती.या

Updated on 06 March, 2022 10:48 AM IST

सध्या राज्यात अफूची शेती केल्याचे प्रकार समोर येत आहेत. अशातच जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वाळकी येथील एक असाच भयानक प्रकार समोर आला आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती अशी की चोपडा तालुक्यातील वाळकी येथील एका शेतकऱ्याने तब्बल साडेतीन एकरावर अफूची लागवड केलेली होती.या

या अफूचे पीक उपटण्याचे मोहीम दोन दिवसांपासून युद्धपातळीवर सुरू असून पन्नास पोलिसांचे पथक येथे ठाण मांडून बसले आहे. याअफूचीकिंमत सात ते आठ कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता पोलिस उपनिरीक्षक अमरसिंगवसावे यांनी व्यक्त केले आहे. याबद्दल सविस्तर माहिती अशी की वाळकी येथील शेतकरी प्रकाश सुधाकर पाटील या शेतकऱ्याने  गट नंबर 40,431/2 यात दीड एकर शेतात व भागवत पितांबर पाटील (रा.घोडगाव) यांच्या भाडेतत्त्वावर घेतलेल्या गट नंबर 554/6 या दोन एकर क्षेत्रात अफूलागवड केली होती.याबाबतची गुप्त माहिती चोपडा ग्रामीण पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली.

ही राज्यातील आतापर्यंतचे सर्वात मोठी कारवाई समजली जात आहे.या कारवाईत शनिवारी सायंकाळी उशिरापर्यंत कांद्याच्या 1000 गोण्यांमध्ये भरूनअफूचीझाडे जप्त केले आहेत.त्यानंतर अजून पाचशेपेक्षा अधिक गोण्यांमध्ये अफूभरण्याचे काम सुरू आहे. यामध्ये पोलिस कर्मचाऱ्यांसह इतर 65 लोक गोण्या भरण्याचे काम करत असून यामध्ये 40 पोलीस शिपाई, पंधरा होमगार्ड आणि दहा स्थानिक मजुरांचा समावेश आहे. या कारवाईत शेतकरी प्रकाश पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून तो त्यांच्यासोबत शेतात आहे. त्याच्यावर सध्या गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

 तपासाअंती होऊ शकते इतर लिंक उघड                                                   

जास्त उत्पन्न मिळावे या अपेक्षेने अफूची शेती केल्याचे पाटीलने पोलीस कारवाई दरम्यान सांगितले. ही लागवड करण्यासाठी त्याने बी अथवा रोपे कुठून आणली? त्याच्यासोबत आणखी कोण भागीदार आहेत किंवा कोणाला विक्री करणार होता? याबाबत ची जास्त माहिती हा गुन्हा चा उलगडा झाल्यानंतर होईल अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक अमरसिंगवसावे यांनी दिली.(स्रोत-दिव्यमराठी)

English Summary: farmer cultivate opium crop in chopda taluka this farmer arrest by police
Published on: 06 March 2022, 10:48 IST