News

भारतामध्ये डेरी व्यवसायाला चालना आणि गती मिळावी यासाठी शासनाने पशुपालन स्टार्टअप योजना सुरु केली आहे. या सुरू केलेल्या स्टार्टअप योजनेच्या अंतर्गत ग्रँड चॅलेंज ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. या देण्यात येणाऱ्या स्पर्धेच्या माध्यमातून शेतकर्यां ना शासनाकडून दहा लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. नेमकी ही योजना काय आहे? याबद्दल या लेखात माहिती घेऊ.

Updated on 02 January, 2022 6:52 PM IST

भारतामध्ये डेरी व्यवसायाला चालना आणि गती मिळावी यासाठी शासनाने पशुपालन स्टार्टअप योजना सुरु केली आहे. या सुरू केलेल्या स्टार्टअप योजनेच्या अंतर्गत ग्रँड चॅलेंज ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. या देण्यात येणाऱ्या स्पर्धेच्या माध्यमातून शेतकर्‍यांना शासनाकडून दहा लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. नेमकी ही योजना काय आहे? याबद्दल या लेखात माहिती घेऊ.

पशुसंवर्धन स्टार्टअप ग्रँड चॅलेंज स्पर्धा

 या स्पर्धे अंतर्गत कोट्यावधी रुपयांची बक्षिसे देण्यात येणार असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले आहे. हे या स्पर्धेचे हे दुसरे पर्व असून या आधीची  स्पर्धा ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 सप्टेंबर 2019 रोजी जाहीर केली होती. ही स्पर्धेचे उद्दिष्ट म्हणजे पशू संवर्धन आणि दुग्ध व्यवसाय क्षेत्रासमोरील ज्या समस्या आहेत त्यांच्यावर उपाय आणि समस्या सोडवण्यासाठी तसेच त्यावर नावीन्यपूर्ण आणि व्यावसायिक दृष्ट्या व्यवहार हे उपाय शोधण्यासाठी केंद्रीय पशु संवर्धन,मत्स्य व्यवसाय आणिदुग्ध व्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रूपाला यांनी सुरू केले आहे.

यामध्ये पशुसंवर्धन आणि डेअरी उद्योगाशी संबंधित असलेल्या 6 प्रमुख समस्या सोडवण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पना पुढे याव्यात यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

 दुग्ध व्यवसाय( डेरी उद्योग ) समोरील सहा समस्या..

  • प्राण्यांची ओळख आणि त्यांच्या शोधासाठी किफायतशीर तंत्रज्ञानाचा विकास करणे.
  • वीर्य दोष साठवण्यासाठी आणि त्याचा पुरवठा करण्यासाठी दीर्घकालीन आणि किफायतशीर तसेच वापरकर्ता अनुकूल पर्याय शोधणे.
  • उष्णता शोधक किटचा विकास
  • दुग्धजन्य प्राण्यांसाठी गर्भधारणा निदान किट विकसित करणे.
  • ग्राम संकलन केंद्रापासून ते डेरी प्लांट पर्यंत विद्यमान दूधपुरवठा साखळीत सुधारणा करणे.
  • कमी खर्चात शीतकरण आणि दूध संरक्षण प्रणाली आणि डेटा लॉगर चा विकास करणे.( संदर्भ- मॅक्स महाराष्ट्र)
English Summary: farmer can win ten lakh rupees through startup grand challenge compition
Published on: 02 January 2022, 06:52 IST