पंतप्रधान हवामान आधारित फळपीक विमा योजना केंद्र शासनाची योजना असून या योजनेअंतर्गत गारपीट या हवामान धोक्यापासून शासनाने पिकांना या फळबागांना संरक्षण दिलेलेनाही. मध्यंतरी वादळी वाऱ्यामुळे आणि गारपिटीमुळे फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे
अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी विमा उतरलेला आहे किंवा ज्यांना विमा संरक्षण घ्यावयाचे आहे त्यांनी बँकेत जाऊनच हप्त्याची रक्कम भरावी लागणार आहे. कारण गारपिटीमुळे किंवा वादळामुळे नुकसान झाल्यास विमा संरक्षण घेण्यासाठी चा स्वतंत्र पर्याय केंद्रशासनाच्या पोर्टलवर नाही. परंतु शेतकर्यांना गारपीट व वादळ सारख्या नैसर्गिक आपत्तीपासून विमा संरक्षण घेण्यासाठी बँकेत विमा हप्ता भरता येतो, असे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
फळ बागायतदार हे पीएमएफबीवाय या केंद्र सरकारच्या पोर्टलवर ऑनलाईन विमा हप्त्याची रक्कम भरतात.परंतु यामध्ये वादळ या हवामानधोक्याचा केंद्र शासनाच्या योजनेत समावेश नसल्याने त्यासाठीचा विमा पोर्टलवर स्वीकारला जात नाही. त्यामुळे फळ बागायत शेतकऱ्यांची अडचण झाली आहे.विमा हप्ता भरण्याची वेळ आली असून शेतकऱ्यांनी विमा हप्ता भरला तर त्यांना अनुदानाचा मार्ग सुखकर होणार आहे.
म्हणून शेतकऱ्यासाठी गारपीट व वादळ या नैसर्गिक धोक्यासाठी चा विमा हरण्याची कुठलीही सुविधा पोर्टलवर नसल्याने शेतकऱ्यांनी यासंबंधीचा विम्याचा हप्ता बँकेत जमा करावा लागणार आहे. कारण हवामान धोक्यामध्ये आता फळपिकांचा समावेश करण्यात आला आहे.
Published on: 24 October 2021, 10:25 IST